आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#MeToo चळवळीबाबत काजोल म्हणाली, 'याचा परिणाम दिसतोय, पुरुष घेत आहेत माघार'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
'देवी'च्या स्क्रिनिंगला एकत्र आलेले कलाकार - Divya Marathi
'देवी'च्या स्क्रिनिंगला एकत्र आलेले कलाकार

बॉलिवूड डेस्कः मीटू चळवळीनंतर चित्रपटाच्या सेटवर महिलांसाेबत होणाऱ्या वागणुकीमध्ये खूप बदल झालेला आहे. हे खूप महत्त्वपूर्ण पाऊल हाेते, ज्याचा परिणाम स्पष्ट दिसून येतोय, असे अभिनेत्री काजोल शाॅर्ट फिल्म 'देवी'च्या स्क्रीनिंगदरम्यान म्हणाली. काजोलची प्रमुख भूमिका असलेला 'देवी' हा लघुपट 2 मार्च रोजी प्रदर्शित झाला. यानिमित्ताने मुंबईत याचे खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होती.  

मीटू चळवळीनंतर चित्रपटाच्या सेट्सवर झालेत बदल 

कार्यक्रमात काजोलला विचारले की, मीटू चळवळीनंतर चित्रपटाच्या सेटसवर महिलांसोबतच्या वागणुकीत काही बदल झालेत का? त्यावर काजोल म्हणाली, 'हो, बदल तर झाले आहेत, आणि हे बदल फक्त चित्रपटाच्या सेट्सवर झाले आहेत असे मी म्हणणार नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ही चळवळ सुरू झाल्यानंतर जर तुम्ही कोणत्याही पुरुषाला विचाराल तर तुम्हाला लगेच समजेल की, यात अडकल्यानंतर चांगले, वाईट, सर्व प्रकारच्या पुरुषांनी आपली पावले मागे घेतली आहेत. या प्रकरणात बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत आणि बरेच काही विचारपूर्वक आणि सावधानतेने होण्याची गरज आहे. '

लोक बोलण्याचे धाडस करत आहेत - श्रुती हसन 

यावेळी 'देवी'मध्ये काम करत असलेली श्रुती हसन म्हणाली, 'मी विचार केला नव्हता की, भारतामध्ये ही चळवळ इतक्या मोठ्या प्रमाणात होईल. लाेकांमध्ये बोलण्याचे धाडस आहे याचा मला गर्व आहे.'
 
'देवी'द्वारे काजोलचे डिजिटल विश्वात पदार्पण 

'देवी' या लघुपटात यामध्ये हिंदीसोबतच मराठी कलाकारसुद्धा झळकले आहेत. या लघुपटाच्या निमित्ताने मराठीतली आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वेने पहिल्यांदाच काजोलसोबत काम केले आहे. काजोल आणि मुक्तासोबतच यामध्ये श्रुती हसन, नेहा धुपिया, नीना कुळकर्णी, संध्या मात्रे, रमा जोशी, शिवाजी रघुवंशी आणि यशस्विनी दायमा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे केवळ दोन दिवसांत या लघुपटाचं चित्रीकरण पूर्ण झाले. प्रियांका बॅनर्जीने हा लघुपट लिहिला असून त्याचं दिग्दर्शनसुद्धा तिनेच केलं आहे. काजोलचा हा पहिलाच लघुपट असून तिच्यासोबत श्रुतीनेसुद्धा ‘देवी’च्या माध्यमातून डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे.