आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kajol Said On The Birthday Of Mother Tanuja 'Mother Had Been Slapped Me So Many Times In Childhood'

आई तनुजा यांच्या वाढदिवसानिमित्त काजोल म्हणाली - लहानपणी आईचा खूप मार खाल्ला आहे..' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : काजोलची आई आणि गतकाळातील अभिनेत्री तनुजा 76 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1943 ला झाला होता. त्यांचे प्रसिद्ध चित्रपट 'बहारें फिर भी आएंगी' (1966), 'ज्वेल थीफ' (1967), 'हाथी मेरे साथी' (1971) आणि 'अनुभव' (1971) हे आहेत. 60 आणि 70 च्या दशकामध्ये संजीव कुमार, धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. तनुजा यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी काजोलने आपल्या भावना दैनिक भास्करसोबत शेअर केल्या.  

लहानपणी आईचा खूप मार खाल्ला आहे - काजोल... 
मला आठवते लहानपणी आईचा खूप मार मिळायचा. जेव्हा माझी मुलगी न्यासा झाली तेव्हा मी आईला हेच म्हणाले होते की, 'आई मला नाही माहित की, आजपर्यंत तू मला किती प्रेम दिले आणि माझी कशी काळजी घेतली. मी कधीच तुझ्या संगोपनाचे आभार मनू शकत नाही. आज जेव्हा मी स्वतः आई बनले आहे आणि एका बाळाची काळजी घेते आहे, तेव्हा मला कळते आहे की, एका लहान मुलाची काळजी घेणे किती कठीण असते. येथे केवळ त्यांना अंघोळ वगैरे घालण्याची गोष्ट नाहीये, तर गोष्ट आहे त्या जबाबदारीची आणि त्या गीष्टींची ज्या तुम्ही तुमच्या बाळाला शिकवता."

आईला शिव्या देण्याची खूप वाईट सवय होती... 
लहानपणीचीच गोष्ट आहे, आईला शिव्या देण्याची खूप वाईट सवय होती. तिच्या शिव्या लिजेंड्री आहेत. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा तिने मला शिकवले की, शिव्या देणे वाईट सवय आहे. ती मला म्हणाली की, जे लोक शिव्या देतात, त्यांचा शब्दकोष चांगला नसतो. मी तिला वैचारले मग तू का शिव्या देतेस ? त्या दिवसापासून तिने शिव्या देणे बंद केले. हा एक खूप मोठा निवार्णाय होता. 

तनुजा यांच्याबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी... 
वयाच्या 13 व्या वर्षी गेल्या होत्या स्वत्झर्लंडला 
वयाच्या 13 वर्षी तनुजा शिकण्यासाठी स्वत्झर्लंडला गेल्या होत्या. यादरम्यान तनुजा यांच्या आईने त्यांना लॉन्च करण्यासाठी 1958 मध्ये 'छबीली' नावाचा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. 

गीता बाली यांना केले रिप्लेस... 
1961 मध्ये 'हमारी याद आएगी' हा तनुजा यांच्या करिअरमधील महत्वाचा चित्रपट ठरला. या चित्रपटात तनुजा यांचा अभिनय पाहून प्रेक्षकांना कळाले की, त्यांना गीता बाली यांची जागा भरून काढणारी अभिनेत्री मिळाली आहे. 

टॉम बॉयची मिळाली उपाधी...  
लहानपणी तनुजा यांना आई आणि ताई नूतन यांनी एवढे लाड आणि प्रेम दिले की, त्या बेफिकीर झाल्या आणि त्यामुळे 50 च्या दशकात त्यांना टॉम बॉयची उपाधी मिळाली. 

बातम्या आणखी आहेत...