आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी फॅन्सला सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहेत. याचदरम्यान काजोलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कोरोना व्हायरसशी निगडित एक मीम शेअर करून फॅन्सला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.
डीडीएलजेवर बनले मीम...
काजोलने जे मीम शेअर केले आहे ते 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' च्या क्लासिक सीनवर बनवले गेले आहे. या सीनमध्ये सिमरन (चित्रपटात जे काजोलच्या भूमिकेचे नाव आहे) ट्रेनमध्ये चढण्यासाठी शाहरुख खानचा हात पकडण्यासाठी पाळताना दिसत आहे. पण कोरोना व्हायरसमुळे तिच्या हातात फोटोशॉपने सॅनिटायझर दाखवले गेले आहे, जे ती शाहरुखला देताना दिसत आहे. काजोलने हे मीम शेअर करत लिहिले, 'एवढेच नाही तर, आता सिमरनलादेखील माहित आहे की, सॅनिटायझिंग किती गरजेचे आहे.'
कृती खरबंदानेदेखील फॅन्सला दिला सल्ला....
काजोलव्यतिरिक्त कृती खरबंदानेदेखील आपल्या इंस्टाग्रामवर कोरोना व्हायरसबद्दल लिहिले, 'आपण सर्व एक आहोत, चला मिळून लढूया, घरात राहा, स्वच्छ राहा आणि हा वेळ हे शोधण्यात घालावा की, काय काय गमावले आहे आणि काय कमवायचे बाकी आहे. सुरक्षित राहा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.