आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलने तिच्या DDLJ च्या शाहरुखसोबतच्या आयकॉनिक सीनची अशी उडवली खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे'(DDLJ)चा शाहरुख आणि काजोलचा ट्रेनचा सीन सर्वांनाचा ठाऊक आहे. यामध्ये राज (शाहरुख)चा हात पकडण्यासाठी सिमरन (काजोल) रेल्वेमागे पळत असते. ही सीन एवढा प्रसिध्द झाला होता की, यावर अनेक जोक्स तयार झाले आणि अनेक टीव्ही शोजमध्ये याचा उल्लेख झाला. 1995 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट मुंबईच्या मराठा मंदिर थिएटरमध्ये आजही चालतोय. परंतू चित्रपट रिलीजच्या 27 वर्षांनंतर अभिनेत्री काजोलने त्या सीनची खिल्ली उवडली आहे. काजोलने एका मुलाखतीत म्हटले की, जेव्हा चित्रपटात 'जा सिमरन जा' डायलॉगसोबत ट्रेनचा सीन शूट होत होता, तेव्हा आम्ही चिंतेत होतो. कारण ट्रेन योग्य स्पीडने चालत नव्हती. वारंवार रीटेक घ्यावे लागत होते. यामध्ये खुप वेळ लागला कारण ट्रेन तिथून येण्याजाण्यासाठी 20 मिनिटे लागत होते. मला वाटते की, तो शूट चुकीचा होता. मला वेड्यासारखे पळवण्याऐवजी चेन ओढून ट्रेन थांबवायला पाहिजे होती. 
DDLJ मध्ये शाहरुख खान आणि काजोलची केमिस्ट्री स्क्रिनवर खुप पसंत केली गेली. DDLJ सोबतच हे दोघं 'बाजीगर', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'माय नेम इज खान', आणि 'दिलवाले' चित्रपटातही एकत्र दिसले आहेत. 


- काजोल आता दिर्घकाळानंतर 'हेलिकॉप्टर इला' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...