आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजयने पत्नीचा मोबाइल नंबर 982012XXXX ट्वीटरवर केला शेअर, व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन दिसतेय काजोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने सोमवारी त्याची पत्नी काजोलचा मोबाइल नंबर ट्वीटरवर शेअर केला आहे. हे ट्वीट त्याच्या व्हेरिफाइड अकाउंटवरुन संध्याकाळी 5.11 मिनिटांनी करण्यात आले आहे. अजयने मोबाइल नंबर शेअर करुन ट्वीट केले, काजोल सध्या भारतात नाहीये, तुम्ही तिच्याशी 98260XXXXX या तिच्या व्हॉट्सअॅप नंबरवर संपर्क साधू शकता. 

 

काजोल सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने भारताबाहेर आहे. अजय देवगणच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर हे ट्वीट रिट्वीट करण्यात येत असून त्यावर अनेक कमेंट्सही येत आहेत. खरं तर ही अजय देवगणची खासगी बाब आहे. पण जर एखाद्या व्यक्तीने त्याची खासगी माहिती सोशल मीडियावर शेअर केल्याची तक्रार केल्यास, माहिती शेअर करणारी व्यक्ती अडचणीत सापडू  शकते. या प्रकरणी त्या व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. जाणून घेऊयात, या कायद्याविषयी.. 

 

अशा प्रकरणांमध्ये आयटी अॅक्टअंतर्गत होऊ शकते कारवाई...
 - मप्र हायकोर्टचे वरिष्ठ वकील संजय मेहरा यांनी सांगितले, विना परवानगी एखाद्याचा फोटो, मोबाइल नंबर किंवा इतर खासगी माहिती शेअर केल्यास आयटी अॅक्टची भांदवी कलम 66 ई के लागू होते. 
- अशा प्रकरणांमध्ये दोषी व्यक्तीला तीन वर्षांच्या शिक्षेची तरतुद किंवा दोन लाखांचा दंड ठोठावला जातो. कधी कधी या दोन्ही शिक्षा एकत्रित सुनावल्या जातात.  

- अनेक जण इंटरनेटवर अनेक अॅक्टिव्हिटी करत असतात. यामध्ये ब्राउजिंग करणे, सेलिंग, सर्फिंग, चॅटिंग यांचा समावेश असतो. काही चुकीचे आढळल्यास त्याच्याविरोधात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट, 2000 अंतर्गत कारवाई केली जाते. 
- इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट, 2000 च्या सेक्शन 67 नुसार, जर एखाद्या व्यक्तीने इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये चुकीची माहिती शेअर केली, तर त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि एक लाखांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. 
- दुस-यांचा हाच गुन्हा केल्यास त्या व्यक्तीला 10 वर्षांची शिक्षा आणि दोन लाखांचा दंड भरावा लागू शकतो. 

बातम्या आणखी आहेत...