आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kajol's Mother Is Not Well She Is Admitted In Hospital, Kajol Spotted While Going To Meet Her

मुंबई : सासऱ्यांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी काजोलच्या आईची बिघडली तब्येत, भेटण्यासाठी पोहोचली रुग्णालयात  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सोमवारी अजय देवगणचे पिता वीरू देवगण यांचे निधन झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी काजोलची आई आणि गतकाळातील अभिनेत्री तनुजा यांची तब्येत बिघडली. त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले. मंगळवारी संध्याकाळी काजोल लीलावती रुग्णालयाबाहेर दिसली. ती तिच्या आईला भेटण्यासाठी पोहोचली होती. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये 2018 मध्येही तनुजा यांना श्वास आणि पाठदुखीचा त्रासामुळे हॉस्पिलमध्ये अॅडमिट केले गेले होते. 

 

तनुजा यांच्या आजाराची माहिती नाही... 
तनुजा यांना कोणत्या आजारामुळे रुग्णालयात दाखल केले गेले होते, याबद्दल कुटुंबीयांनी काहीही माहिती दिली नाही. सोमवारीच काजोलचे सासरे वीरू देवगण यांचे अंतिम संस्कार केले गेले आणि आता तिच्या आईची तब्येत खराब झाल्यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण आहे. मागच्या दोन दिवसात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज अजय-काजोल यांचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले होते. काजोलला ऐश्वर्या राय बच्चनसोबत स्पॉट केले गेले होते. ऐश्वर्याने काजोलला आलिंगन देऊन सांत्वन करताना दिसली. 

बातम्या आणखी आहेत...