आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी भैरव अष्टमीला भैरव मंत्राचा उच्चर करून शेंदूर आणि तेलाने करावा देवाचा शृंगार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 19 नोव्हेंबरला काळभैरव अष्टमी आहे. प्राचीन काळात याच तिथीला महादेवाने काळभैरवाचा अवतार घेतला होता. यामुळे या दिवशी काळभैरवाची विशेष पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, 10 असे काम जे काळभैरव अष्टमीला केल्यास घरात सुख-शांती वाढते...

1. मंगळवारी संध्याकाळी स्नान करून शेंदूर, सुगंधित तेलाने भैरवाचा शृंगार करावा. लाल चंदन, अक्षता, गुलाबाचे फुल, जानवे, नारळ अर्पण करावे. तिळगुळ किंवा गुळ-शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा.

2. सुगंधित धूप-अगरबत्ती आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर खालील भैरव मंत्राचा जप करावा. 

धर्मध्वजं शङ्कररूपमेकं शरण्यमित्थं भुवनेषु सिद्धम्। द्विजेन्द्र पूज्यं विमलं त्रिनेत्रं श्री भैरवं तं शरणं प्रपद्ये।।

3. या दिवशी भैरव गायत्री मंत्राचाही जप करू शकता. 

ऊँ शिवगणाय विद्महे। गौरीसुताय धीमहि। तन्नो भैरव प्रचोदयात।। या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. त्यानंतर भैरवासमोर धूप, दीप आणि कापूर लावून आरती करावी.

5. भैरवाचे वाहन श्वानाला पोळी खाऊ घालावी.

6. भैरवाचा अवतार प्रदोष काळ म्हणजे दिवस-रात्रीच्या मिलन काळात झाला होता. यामुळे भैरवाची पूजा संध्याकाळी आणि रात्री करणे सर्वात जास्त शुभ मानले जाते.

7. रुद्राक्ष महादेवाचे स्वरूप आहे. यामुळे भैरव पूजेत रुद्राक्षाची माळ धारण करावी. रुद्राक्षाच्या माळेने भैरव मंत्राचा जप करावा.

8. भैरव पूजेमध्ये ऊँ भैरवाय नम: मंत्राचा उच्चार करत चंदन, अक्षता, फुल, सुपारी, दक्षिणा, नैवद्य अर्पण करा.

9. काळभैरव तसेच महादेव आणि देवी पार्वतीची पूजा अवश्य करावी.

10. या दिवशी अधार्मिक कामापासून दूर राहावे. आई-वडील आणि इतर कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा अनादर करू नये. क्रोध करू नये. घरात कलहाचे वातावरण निर्माण होईल असे वागू नये.

बातम्या आणखी आहेत...