आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kal Ho Na Ho 15 Years: Shah Rukh Khan And Preity Zinta Co Star Jhanak Shukla Grown Up And She Is TV Actress Daughter

15 वर्षांत एवढी बदलली शाहरुखच्या ‘कल हो न हो’मधील जिया, 'कुमकुम भाग्य'च्या अॅक्ट्रेसची आहे मुलगी, नाकारला आहे संजय लीला भन्साळींचा चित्रपट : Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः 28 नोव्हेंबर 2003 रोजी प्रदर्शित झालेल्या कल हो ना हो या चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुख खान स्टारर या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. विशेषतः चित्रपटात प्रीती झिंटाच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारणारी क्युट मुलगी नक्कीच तुम्हाला आठवत असेल. आता या क्यूट गर्लने तारुण्यात पदार्पण केले आहे. तिचे नाव झनक शुक्ला आहे. गेल्या 15 वर्षांत तिच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव असते. 


सोनपरी मालिकेतही केले होते काम... 
- 2000 साली छोट्या पडद्यावर प्रसारित झालेली 'सोनपरी' ही मालिका आठवतेय का तुम्हाला... या मालिकेतील सोनपरीपासून ते फ्रुटीपर्यंतचे सर्वच पात्र अतिशय गाजले होते. विशेषतः या मालिकेतील चिमुकली प्रिन्सीला तर आपण विसरु शकत नाही. त्यावेळी प्रिन्सीची भूमिका साकारली होती चार वर्षांच्या झनक शुक्लाने. 
- 24 जानेवारी 1996 रोजी जन्मलेली झनक आता 23 वर्षांची ब्युटीफुल गर्ल आहे.
-  झनक 'कुमकुम भाग्य' या मालिकेत काम करणारी अभिनेत्री सुप्रिया शुक्ला आणि डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर हरी शुक्ला यांची मुलगी आहे. 'कुमकुम भाग्य' या मालिकेत सुप्रिया अभिनेत्री श्रुती झाच्या आईच्या भूमिकेत झळकत आहे.

 

नाकारली होती संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाची ऑफर...

- 2005 साली रिलीज झालेल्या ‘ब्लॅक’ या सिनेमातील आयशा कपूरने साकारलेली भूमिका सर्वप्रथम झनकला ऑफर झाली होती. पण शूटिंग जास्त दिवस चालणार असल्याने ही ऑफर झनकने नाकारली होती. या सिनेमासाठी आयशाला बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसचा ‘फिल्मफेयर अवॉर्ड’ मिळाला होता. 
 - ‘कल हो न हो’ या सिनेमाव्यतिरिक्त झनकने 'डेडलाइन: सिर्फ 24 घंटे' या सिनेमातसुद्धा काम केले आहे.
- तर छोट्या पडद्यावर 'सोनपरी' शिवाय ती ‘करिश्मा का करिश्मा’, 'हातिम', 'गुमराह' आणि अनेक जाहिरातींमध्ये दिसली आहे.

 

झनकला सुरु करायचे आहे NGO...
-  झनक आता BA करत आहे. तिला सामाजिक कार्य करायचे आहे. सोबतच स्वतःचे NGO उघडण्याची तिची इच्छा आहे. घरगुती हिंसेला बळी पडलेल्या महिलांसाठी तिला एनजीओ सुरु करायचे आहे. 
 - झनकला चित्रपटसृष्टीत करिअर करायचे नाही. 2014 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, ती अभिनय करुन आता कंटाळली आहे. त्यामुळे तिने चित्रपटांपासून दूर राहणे पसंत केले आहे. 


अशी आहे झनकची ड्रेसिंग स्टाइल...
- झनकला सिंपल कुर्त्यांना डेनिम्स आणि लेगिंग्ससोबत परिधान करणे पसंत आहे. झनक कम्फर्टला अधिक महत्त्व देते. तिची स्टाइल अतिशय सिंपल, कॅज्युअल आणि फ्यूजन टच देणारी आहे. तिला टिकली आणि ऑक्सिडाइस्ड ट्राइबल इयररिंग्सची आवड आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, झनकचे आणखी काही PHOTOS... 
 

 

बातम्या आणखी आहेत...