आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ट्रेनमधून प्रवासादरम्यान अनेक डोगंर-दऱ्यांच्या दृश्यांना पाहता येणार; 15 डिसेंबरपासून तुम्हीही करु शकतात प्रवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आता तुम्हीदेखील शिमला शहरात वर्ल्ड हेरिटेज कालका-शिमला टॉय ट्रेनमध्ये प्रवास करताना निसर्गातील सुंदर दृश्यांना पाहू शकणार आहात. कारण मुख्य रेल्वेने 15 डिसेंबरपासून विस्टाडोम कोचला सामान्य लोकांसाठी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, कालका-शिमला ट्रेनमध्ये पर्यटकांसाठी विस्टाडोम कोचला जोडण्यात येणार  आहे. या कोचमध्ये पारदर्शी छत आणि खिडक्या असणार आहे. या पारदर्शी कोचमध्ये बसून पर्यटकांना कालका ते शिमलापर्यंतच्या नयनरम्य दृश्यांना पाहता येणार आहे. सध्या या विशेष कोचची ट्रायल सुरू असून लवकरच हा कोच लोकांच्या सेवेत हजर होणार आहे.   

 

एका विस्टाडोम कोचसाठी 10 लाख रुपयांचा खर्च 

कालका-शिमला ट्रेनचा विस्टाडोम कोच हा पुर्णपणे वातानुकूलित असून या कोचच्या छताला 12 मिलीमीटरच्या काचा लावलेल्या आहे. या कोचमध्ये प्रवाशांना जेवन करण्यासाठी त्यांच्या सिटला ट्रे जोडण्यात आले आहे. कोचच्या आतमध्ये विनाईल प्लोरींग बसवण्यात आले असून आतमध्ये तापमान दर्शवणारे यंत्र लावले आहे. कोचच्या आतमधील इंटिरिअर डिझाईनदेखील आकर्षक बनवण्यात आली आहे.   

 

इतके असेल भाडे

या कोचचे भाडे सामान्य कोचच्या रकमेपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. अंबालाचे डीआरएम दिनेश चंद शर्मा यांनी सांगितल्यानुसार, विस्टाडोम कोचचे कालका-शिमलापर्यंतचे भाडे जवळपास 500 रुपयांपर्यंत असू शकते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा-  कालका ते शिमलापर्यंतच्या प्रवासातील आकर्षणाच्या केंद्राबद्दल


 

बातम्या आणखी आहेत...