आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करतेय कल्कि कोचलिन, बेबीबंपसोबत केले खास फोटोशूट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कल्कि कोचलिन लवकरच आई होणार असून या महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. अलीकडेच कल्किने एका फॅशन मॅगझिनसाठी खास फोटोशूट केले आहे. यात तिचे बेबीबंप स्पष्ट दिसत आहे. या नव्या फोटोशूटमध्ये कल्किच्या चेह-यावर आई होणार असल्याचा आनंद स्पष्ट झळकतोय. विशेष म्हणजे कल्कि लग्नाआधीच प्रेग्नंट आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसूपासून घटस्फोट घेतल्यानंतर गेल्या ती इस्रायली क्लासिकल पियानिस्ट गाय हर्शबर्गला डेट करतेय. सोबतच या नात्याची अधिकृत घोषणाही तिने केली.  

  • वॉटर बर्थ पद्धतीने देणार बाळाला जन्म

कल्कि  जानेवारी महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. आपल्या बाळाचा जन्म वॉटर बर्थ पद्धतीने व्हावा आणि त्याला एखादं युनिसेक्स (स्त्री आणि पुरुष दोहोंसाठीचे) नाव द्यावं अशी इच्छा तिने मुलाखतीत बोलून दाखवली आहे.

  • अनपेक्षित गर्भधारणा...

कल्किने काही महिन्यांपूर्वी पहिल्यांदा बेबी बंपचा फोटो शेअर करत लग्नाअगोदर गरोदर असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी तिने 'अनपेक्षित गर्भधारणा' (Unexpected Pregnancy) असाही उल्लेख केला होता.  त्यानंतर  तिने 'मिड डे'ला एक मुलाखत दिली होती, त्यात ती म्हणाली होती, 'सुरुवातीला गरोदरपणाबाबत मला काहीही वाटलं नाही. माझ्यात असे काही खास बदल जाणवले नाहीत. मला हे माझ्या शरिरावर एका परकीय आक्रमणासारखे जाणवले. माझ्या शरिरातील एक-एक गोष्ट शोषली जात असल्याचे जाणवत होते. परंतु जेव्हा मी बाळाच्या ह्रदयाचे ठोके पहिल्यांदा ऐकले तेव्हा हे मला खुपच खास वाटलं. मला खुप उत्साही वाटू लागले. गर्भधारणेचे पहिले तीन महिने खूपच खराब होती, परंतु आता मी पुढे आशेने बघत असून जानेवारीतील तारखेची वाट पाहात आहे.'

  • लग्नाची घाई करणार नाही...

या मुलाखतीत कल्कि म्हणाली होती, 'मी गरोदर आहे म्हणून लग्नाची घाई करणार नाही. जर कोणत्या कागदपत्रासाठी किंवा बाळाच्या शाळेच्यावेळी गरज वाटली तर आम्ही विचार करू. पण आम्ही आमच्या प्रेमाशी वचनबद्ध आहोत आणि आम्ही कुटुंबाशी प्रामाणिक आहोत.'

बातम्या आणखी आहेत...