आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kalki Koechlin Shared Experiences Related To The Industry, Said After Dev D, I Was Called Russian Prostitute

कल्की कोचलिनने सांगितले इंडस्ट्रीशी संबंधित धक्कादायक अनुभव, म्हणाली - 'देव डी'नंतर मला रशियन वेश्या म्हटले गेले होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री कल्की कोचलिन हिने एका मुलाखतीत फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित अनेक धक्कादायक अनुभव शेअर केले. कल्किने सांगितल्यानुसार,  जेव्हा 'देव डी' हा तिचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तिला एका व्यक्तीने रशियन वेश्या म्हणून संबोधले होते. ती सांगते, "देव डी' रिलीज झाल्यानंतर मी वाचले की, कुणीतरी असे म्हटले, 'त्याला (चित्रपट निर्मात्यांना) रशियन वेश्या कोठून मिळाली?" आणि माझी प्रतिक्रिया अशी होती की मी एक रशियन नाही."

  • निर्मात्याने दिला होता लैंगिक प्रस्ताव

पिंकविलाबरोबर झालेल्या बातचितमध्ये कल्किने आणखी एक घटना शेअर केली. तिने सांगितले की, तिला एका निर्मात्याकडून अप्रत्यक्षरित्या लैंगिक ऑफर मिळाली होती आणि जेव्हा तिने त्याच्यासोबत येण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिला ब्लॅकलिस्ट केले होते. कल्की सांगते, "तो थेट लैंगिक प्रस्ताव नव्हता, पण त्याचा अर्थ तोच होता. निर्मात्याला माझ्यासोबत डेटवर जायचे होते. मी उत्तर दिले - नाही, कधीच नाही. त्यानंतर तो चित्रपट कधीच बनला नाही."

  • जेव्हा 9 महिने काम मिळाले नाही

कल्कीने तिच्या वाईट काळाविषयी सांगितले. ती म्हणाली "मी  8-9 महिन्यांचा काळ काम न करता घालवला.  हा काळ 'ये जवानी है दिवानी'नंतरचा होता.  विशेष म्हणजे अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर होता. या चित्रपटात रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होते.

  • हॉलिवूडमध्येही होतो लैंगिक छळ

कल्कीने सांगितल्यानुसार, तिला लैंगिक छळ सहन करावा लागला आहे. ती सांगते, "माझ्यावर लैंगिक अत्याचार केले गेले. मी माझ्या थेरपिस्ट आणि माझ्या जोडीदाराला (जो त्यावेळी होता) याविषयी सांगितले. नंतर राहुल बोस यांनी परिषद घेतली तेव्हादेखील मी त्याबद्दल चर्चा केली." अशा घटना फक्त बॉलिवूडपुरत्या मर्यादीत नसतात असे कल्कीचे म्हणणे आहे. हॉलिवूडमध्येही असेच घडते.

  • गर्भावस्थेचा काळ एन्जॉय करतेय कल्की

कल्की अलीकडेच नेटफ्लिक्सची मालिका 'सेक्रेड गेम्स'च्या दुस-या पर्वात दिसली होती. ती झी-5 सीरिजच्या 'भ्रम'मध्येही झळकली होती. कल्की आता पहिल्यांदाच आई बनणार आहे आणि बॉयफ्रेंड गाय हर्षबर्गबरोबर प्रेग्नन्सीच्या काळाचा आनंद घेत आहे. कल्कीचे पहिले लग्न चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपशी झाले होते. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2015 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.