आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Metoo विषयी कल्कि म्हणते, 'लैंगिक शोषणाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही चळवळ अविस्मरणीय आहे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्की कोचलिनला वेगळ्या भूमिका आणि कंटेंटवर आधारित चित्रपटासाठी ओळखले जाते. सध्या ती वेब सिरीज 'स्मोक'मध्ये दिसत आहे. यात तिने पोर्तुगाली तरुणीची भूमिका साकारली आहे. या मुलाखतीत तिने वेब सिरीज आणि 'मी टू' चळवळीवर बातचीत केली... 

 

> 'स्मोक' करण्यासाठी कुणाची प्रेरणा मिळाली ? 
यात गोव्याची वेगळी बाजू पाहायला मिळाली. गोव्याला नेहमीच पर्यटनस्थळ म्हणून दाखवले जागते. मात्र, स्मोक मालिकेत याच्या नकारात्मक गोष्टीदेखील दाखवण्यात आल्या आहेत. माफिया काय करतात, कसे काम करतात, ड्रग्जचा व्यवसाय कसे करतात. नार्कोटिक्स याच्या विरुद्ध कसा उभा राहतो आणि नेते याचा कसा फायदा घेतात, हे सर्व यात दाखवण्यात आले. यानेच मला प्रेरित केले. 

 

> 'स्मोक' तुझी पहिली वेब सीरीज आहे का ? 
मी वेब सिरीज 'मेन्स वर्ल्ड' मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. ही माझी पहिली वेब सिरीज होती. मी डिजिटल जगाचा भाग बनू इच्छित आहे, कारण हे वेगाने पुढे चालले आहे. कोणतीही सिरीज निवडताना ती किती दिवस चालेल, हे पाहावे लागते. कारण सध्या दुसरा किंवा तिसरा भाग बनवण्याची पद्धत सुरू झाली आहे. 

 

> 'स्मोक'च्या शूटिंगमध्ये कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला ? 
आम्ही यासाठी 10 ते 11 तास शूट केले. वेब सिरीजमध्ये पात्राचा आलेख माेठा असतो. यात क्लायमॅक्स आधी शूट करावे लागते. तथापि सुरुवात शेवटी करावी लागते. यात सर्व काही कलाकारांवर अवलंबून राहते. 

 

> तू डीजेची भूमिका साकारतेय का? 
हो, डीजे एक पोर्तुगाली मुलगी आहे. माझ्यासाठी एक प्रशिक्षक ठेवण्यात आला होता, त्याने मला भाषा शिकवली. मला डीजेवर संशोधन करावे लागले. ती एक भावुक मुलगी आहे. ती संगीतावर प्रेम करते. मात्र, ती चुकीच्या लाेकांमध्ये अडकते. तेथून बाहेर पडण्यासाठी ती संघर्ष करते. 

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, मीटू मोहिमेविषयी आणि आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगतेय कल्कि... 

बातम्या आणखी आहेत...