आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाउमेदीतून शब्दछटांचा अंकुर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेत बोलू शकते, असा माझा आत्मविश्वास होता. त्यानंतरही मला वत्कृत्व स्पर्धेत सहभागी करून घेतले नाही.  समारोपाच्या समारंभात मात्र, मी नाउमेद करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
 
गुरुपौर्णिमेनिमित्त वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा मी व्यक्त केली. पण ‘तुला वक्तृत्व हा शब्द तरी उच्चारता येतो का? तू काय बोलणार असे म्हणत ‘ते’ हसले.  मात्र सर्वासमक्ष नाउमेद करण्यात आलेल्या या कुंचल्याने दहावीच्या निरोप समारंभात शब्दछटा उमटवत शिक्षकांसह सर्वांची वाहवा मिळवली. शिक्षकांनी विद्यार्थी ओळखावेत पण त्यांना नाउमेद करू नये.

वडिलांची बदली वाईला झाल्याने तेथेच एका शाळेत प्रवेश घेतला. गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मलाही सहभागी होण्याची इच्छा होती. वक्तृत्व विभाग सांभाळणाऱ्या अष्टेकर सरांनी ठराविक मुलांची नावे स्पर्धेत घेतली. तेवढ्याच मुलांनी उभे राहावे, असे सांगितल्यानंतरही मी उभी राहिले. त्यांना माझ्याबद्दल काहीही माहिती नव्हती. ते म्हणाले, ‘तू काय बोलणार, असे म्हणत हसले. मला खूप वाईट वाटले. मी खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेत बोलू शकते, असा माझा आत्मविश्वास होता. त्यानंतरही मला कुठल्याच स्पर्धेत सहभागी करून घेतले नाही. ठराविक मुलींनाच सहभागी करून घ्यायचे. नंतर काही दिवसांनी आमच्या शाळेत इनामदार रुजू झाले. ते गायन खूप छान शिकवायचे. अष्टेकरांनी, त्या शिक्षकांना सांगितले की, ही मुलगी हुशार आहे, स्पष्टवक्ती आहे, तिला तुमच्या स्पर्धांमध्ये घ्या. नंतर मी मालती देशपांडे यांच्याकडे अष्टेकरांची लेखी तक्रारही केली. पण या प्रक्रियेत बराच वेळ निघून गेला होता.

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होणार असल्याने मला ही शाळा सोडावी लागणार हे स्पष्ट झाले होते. या समारंभातच मी भाषण करण्याचे ठरवले. माझ्या मैत्रिणी भारती व मनीषा म्हणाल्या, आता कर तू भाषण. मी देखील बोलण्याचा निर्णय घेतला. समोरच अष्टेकर बसलेले होते. पालकांचीही संख्या मोठी होती. मी भाषण करायला उभी होते. मी बोलू लागले. माझे वक्तृत्व या समारंभात उल्लेखनीय ठरले. कोणतीही स्पर्धा नसताना मी केलेले हे वक्तृत्व पाहून मुख्याध्यापिका मालती देशपांडे यांनीही कौतूक केले. त्यानंतर अष्टेकर सर मला म्हणाले, तू खूप छान बोलतेस मी त्यांना म्हणाले बोलते नाही, सर तर चांगलं वक्तृत्व करते का? या प्रश्नावर माझ्या मैत्रिणीही हसल्या. पण त्यांना शाळा सोडताना मी एक वाक्य बोलले.‘विद्यार्थी ओळखायला शिका, विद्यार्थी घडवा त्यांना नाउमेद करू नका...
 

शब्दांकन :  दीपक कांबळ

बातम्या आणखी आहेत...