आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kalraj Mishra Appointed Governor Of Himachal, Acharya Devvrat Transferred As Governor Of Gujarat

कलराज मिश्र हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल, आचार्य देवव्रत यांची गुजरातच्या गव्हर्नर पदी नियुक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार कलराज मिश्र यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहे. कलराज मिश्र यांनी नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उतरण्यास नकार दिला होता. तर दुसरीकडे, हिमाचल प्रदेशचे विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रत यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना आता गुजरातच्या राज्यपाल पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी राज्यसभेचे माजी सदस्य ओपी कोहली राज्यपाल होते.


लोकसभा निवडणुकीच्या वेळी कलराज मिश्र यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्याचवेळी कलराज यांचे राजकीय पुनरवसन केले जाणार असल्याची चर्चा होती. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजपने आपल्याला दुसऱ्या कामांची जबाबदारी दिली. त्यातच आपला वेळ घालवणार असे ते म्हणाले होते. कलराज मिश्र 1978, 2001 आणि 2006 मध्ये राज्यसभा खासदार राहिलेले आहेत. 2012 मध्ये त्यांनी लखनऊ येथून विधानसभेची जागा जिंकली होती. 2014 मध्ये ते देवरिया येथून खासदार म्हणून निवडून आले होते.
 

बातम्या आणखी आहेत...