आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहता-पाहता पत्त्याच्या घराप्रमाणे पडला हा पुल, व्हिडिओ व्हयरल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ठाणे- सोशल मिडियावर  सध्या एक एक व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. 'आपोआपच हा पुल पडला, बरं झाल पुल पडताना त्यावरून कोणते वाहन जात नव्हते', असे कॅप्शन या व्हिडिओसोबत जोडले जात आहे. पण हे पूर्णपणे खोट आहे, हा पडणारा पुल आपोआप पडला नाही तर याला प्रशासनाने पाडला आहे.

 

- व्हिडिओ ठाण्याच्या मुरबाड आणि शहापुर तालुक्यामध्ये असलेल्या कालू नदीवर बनलेल्या शेकडो वर्षे जून्या पुलाचा आहे. हा पुल खुप जूना आणि जीर्ण अवस्थेततील असल्यामुळे पुलाला प्रशासनाने सोमवारी संध्याकाळी 4 वाजता ब्लास्ट करून पाडला आहे. 

 

- वर्षभरापासून या पुलावरून अवजड वाहणांती वाहतुक बंद केली होती, आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना होवू नये यामुळे हा पुल पाडण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. पुल पाडण्याची सुचना आधीच येथील नागरिकांना दिली होती, म्हणून तो पाडत असताना हजारो लोक तेथे जमले. त्यावेळी अनेकांनी पुल पडल्याचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मिडियावर व्हायरल केला. 

 

- या पुलाला पाडल्यानंतर आता नवीन पुल बांधण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. काही दिवसांपूर्वी रायगडच्या महाडमध्ये पुल दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील पुलांचे ऑडिट केले, त्यात हा पुलही धोकादायक घोषित करण्यात आला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...