आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीर सुखासाठी नकार दिला म्हणून दोन तरुणांनी गळा आवळून केली तरूणीची हत्या!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कल्याणी बारीला या ३२ वर्षीय महिलेची हत्या रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी दोन युवकांनी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या दोन्ही युवकांची शरीरसुखाची मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी कल्याणीचा साडीने गळा आवळून खून केला, अशी कबुली पोलिसांना दिली. विशेष म्हणजे कल्याणीच्या खुनाचा संशय तिच्या पतीवर होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात तिचा पतीच आरोपी असल्याचे समोर आले होते. मात्र पोलिस साशंक असल्याने त्यांनी सखोल तपास करून मुख्य आरोपींना गुरुवारी गजाआड केले. 


रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी नारायण मुरलीधर मानवतकर यांच्या शेजारी अकिलाबी नामक महिलेच्या घरात कल्याणी रामलाल बारीला ही महिला भाड्याने राहत होती. तिने हनिफ नवरंगाबादी नामक इसमासोबत निकाह केला होता. ३१ ऑगस्टच्या दुपारी परिसरात दुर्गंधी पसरली. घरामध्ये कल्याणी बारीला हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. 


या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. तिचा पती हनिफ नवरंगाबादी (रा. गवळीपुरा) आणि जळगाव चेतन महाजन या युवकाला ताब्यात घेउन चौकशी करण्यात आली. मात्र चौकशीत या दोघांचा खून प्रकरणाशी संबंध नसल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानंतर स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांनी पीएसआय चंद्रकांत ममताबादे,एएसआय अशोक चाटी, पोकॉ शेख हसन, अब्दुल माजिद, एजाज अहमद, रवि इरचे, नफीस, गिता अवचार व तृष्णा घुमन यांचे पथक गठन करून तपास सुरु केला असता अमोल अशोक अढाव व अब्दुल इम्रान अब्दुल साबीर दोघेही रा. रमाबाई आंबेडकर नगर यांना संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करताच दोघांनीही कल्याणीच्या खुनाची कबुली दिली. दरम्यान, जुने शहर पोलिस ठाण्याचे पीएसआय दिलीप पोटभरे, डीबी स्कॉडचे महेंद्र बहादूरकर यांनी जळगावहून ६ जणांनाही ताब्यात घेतले होते. 


जेसीआय अकोला सिटीतर्फे रविवारी आरोग्य तपासणी 
अकोला : जेसीआय संघटनेच्या अकोला शाखेच्या वतीने आयुर्प्रभा मल्टिस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल येथे ९ सप्टेंबरला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुशील राठी, वातरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्निल गावंडे, शल्यचिकित्सक व पोटविकार तज्ज्ञ डॉ. भारती मुठाळ, डॉ. वैशाली राठोड रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत. असे जेसीआय सिटी अध्यक्ष वैशाली राहाटे, कविता चांडक, प्रकल्प प्रमुख डॉ. स्वप्निल गावंडे यांनी कळवले. 


असे घडले हत्याकांड 
कल्याणी ही २८ ऑगस्ट रोजी जळगावहून अकोल्यात आली होती. त्यानंतर ती रमाबाई आंबेडकर नगरात भाड्याने राहत असलेल्या घरी गेली. तेथून ती तिचा ओळखीचा कालू नामक युवकाला भेटली. त्याच्या दुचाकीवर बसून ती जळगावला परत जायचे म्हणून रेल्वेस्थानकावर गेली. तेथे कालू याने तिला तिकिट काढून दिले व तो निघून गेला. मात्र गाडीला उशीर असल्याने कल्याणीने जळगावला जाण्याचा बेत रद्द करून ती रात्री १२ वाजताच्या सुमारास ऑटोत बसून पुन्हा खोलीवर आली. ऑटोतून उतरताच अमोल अढावू याने तिला विचारपूस केली व तिच्या मागे तिच्या खोलीच्या दिशेने जावू लागला. इतक्यात त्याचा मित्र मो इम्रान तेथे आला. दोघेही कल्याणीच्या मागेच घरात घुसले. तेथे अमोलने तिला शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देत पोलिस तक्रार करण्याची धमकी देताच या दोघांनी तिच्याच साडीने तिचा गळा आवळून खून केला. 

 

बातम्या आणखी आहेत...