आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रीपुलाच्या पाडकामाला सुरुवात, मध्य रेल्वेवर सहा तासांचा जम्बो-ब्लॉक; अनेक गाड्यांचे मार्ग बदलले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण - ब्रिटीशकालीन आणि धोकादायक अवस्थेतील कल्याणचा सर्वात जुना पत्रीपूल पाडण्याचे काम आज केले जाणार आहे. या पाडकामाची सुरू आहे. रविवार (18 नोव्हेंबर ) आज सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 असा सहा तासांचा जम्बोब्लॉक रेल्वे प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. या कालावधीत कल्याण डोंबिवलीदरम्यान एकही लोकल धावणार नाही. या वाहतुकीचा ताण रस्ता वाहतुकीवर पडणार असल्याने सकाळपासूनच वाहतूक आणि शहर पोलीस, केडीएमटी आणि राज्य परिवहन या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीहून कर्जतसाठी सकाळी 8.16 वाजता आणि कल्याणहून सीएसएमटीसाठी शेवटची जलद लोकल सकाळी 9.09 वाजता सोडण्यात येणार आहे. सीएसएमटी ते डोंबिवली आणि कल्याण ते कर्जत, कसारादरम्यान लोकल गाडय़ा नियमितपणे धावतील. त्याशिवाय काही विशेष लोकल फेऱ्याही सोडण्यात येणार आहेत.

 

- मेल-एक्स्प्रेस गाडय़ांपैकी मनमाड एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, जालना जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय अन्य मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळा आणि शेवटचे थांबेही बदलले केले आहेत.

- कल्याण- डोंबिवलीतील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेला जास्त बसगाड्या सोडण्याची विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...