कामाख्या मंदिर / 22 ते 26 जूनपर्यंत अंबुवाची यात्रा, देशभरातून गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात पोहोचतात तांत्रिक

तीन दिवस केली जात नाही कामाख्या देवीची पूजा, मंदिराचे पट राहतात बंद

रिलिजन डेस्क

Jun 23,2019 12:10:00 AM IST


तीन दिवस केली जात नाही कामाख्या देवीची पूजा, मंदिराचे पट राहतात बंद
प्रत्येक वर्षी आसामची राजधानी गुवाहाटी शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या कामाख्या देवी मंदिरात 22 ते 26 जून या काळात अंबुवाची यात्रा आयोजित केली जाते. कामाख्या देवी मंदिर देशातील 52 शक्तीपिठांमधील एक आहे. या प्राचीन मंदिरात देवी सती म्हणजे दुर्गा देवीची मूर्ती नाही. श्रीमद् देवी पुराण आणि शक्तिपीठांकनुसार या ठिकाणी देवी सतीचा योनी भाग पडला होता. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार प्रत्येक वर्षी 22 ते 26 जून काळात येथे अंबुवाची नावाची यात्रा भरते. येथे जाणून घ्या, या मंदिराशी संबंधित खास गोष्टी...


येथे देवी प्रत्येक वर्षी होते रजस्वला
या शक्तीपीठाविषयी एक अत्यंत रोचक कथा प्रसिद्ध आहे. कथेनुसार या ठिकाणी देवीचा योनी भाग पडला होता. यामुळे देवी येथे प्रत्येक वर्षी तीन दिवसांसाठी रजस्वला होते. या काळात मंदिर बंद असते. तीन दिवसांनतर मंदिर पुन्हा उघडले जाते.


प्रसाद रुपात भक्तांना दिला जातो ओला कपडा
येथे प्रसाद रुपात भक्तांना ओला कपडा दिला जातो. या वस्त्राला अम्बुवाची वस्त्र म्हणतात. देवी रजस्वला असताना मूर्तीच्या जवळपास पांढरा कपडा अंथरला जातो. तीन दिवसांनी मंदिर उघडल्यानंतर पांढरा कपडा देवीच्या रजने लाल रंगाने भिजलेला असतो. त्यानंतर हे वस्त्र प्रसाद स्वरुपात भक्तांना वाटले जाते.


मंदिरात नाही देवीची मूर्ती
या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरातील एक कुंड नेहमी फुलांनी झाकून ठेवलेले असते. येथून जवळच एका ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे पीठ देवीच्या इतर सर्व पीठामध्ये महापीठ मानले जाते. कामाख्या पीठ तांत्रिक, मांत्रीकांसाठी सर्वात मोठे आस्था केंद्र आहे. तांत्रिक या ठिकाणाला सर्वात मोठे सिद्धीदायक शक्तीपीठ मानतात.


भैरव दर्शनाशिवाय अपूर्ण आहे कामाख्या यात्रा
कामाख्या मंदिराजवळ उमानंद भैरवाचे मंदिर आहे. उमानंद भैरव या शक्तीपीठाचे भैरव आहे. हे मंदिर ब्रह्मपुत्र नदीच्या मध्ये आहे. असे सांगितले जाते की, यांचे दर्शन घेतल्याशिवाय कामाख्या देवीची यात्रा पूर्ण होत नाही.

X
COMMENT