आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा लढवणार साऊथचा सुपरस्टार कमल हासन, समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - साऊथ सुपरस्टार आणि नेते कमल हासन यांचा पक्ष मक्कल निधी मय्यम (एमएनएम) आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्यांनी म्हटले की, त्यांच्या पक्षाचे ध्येय तमिळनाडूचा विकास हे असेल. आगामी निवडणुकांत समविचारी पक्षांशी आघाडी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पण पक्ष एखाद्या आघाडीत जाणार की स्वतः आघाडीचे नेतृत्व करणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. 


उमेदवारांची निवड लवकरच 
कमल हासन यांनी याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचा राजकीय पक्ष मक्कल निधी मय्यम (एमएनएम) ची स्थापना केली आहे. ते सलग राज्यातील एआईएडीएमके आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. कमल हासन म्हणाले की, मी निवडणूक लवढवणार आहे. लवकरच कमिटी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करेल. तमिळनाडूचा डीएनए बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांशी आघाडी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


कांग्रेसशी आघाडीचे दिले आहेत संकेत
कमल हासनने यापूर्वी म्हटले होते की, काँग्रेसने द्रमुकशी आघाडी तोडली तर आगामी 2019 लोकसभा निवडणुकीत ते त्यांच्याशी हातमिळवणी करण्यास तयार आहेत. ते म्हणाले होते की, काँग्रेस आणि एमएनएमची आघाडी राज्यासाठी फायद्याची ठरेल. त्यांनी राहुल गांधींची भेटही घेतली होती. 


पोटनिवडणूकही लढवणार 
गेल्या महिन्यातच कमल हासन यांनी तमिळनाडूतील 20 जागांच्या पोटनिवडणुकीत त्यांचा पक्षही उतरणार असल्याचे जाहीर केले होते. येथील मद्रास हायकोर्टाने अण्णाद्रमुकच्या 18 आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर या जागा रिक्त आहेत. तर दोन जागा करुणानिधी आणि एके बोस यांच्या निधनानंतर रिक्त झाल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...