• Home
  • Bollywood
  • News
  • Kamal Haasan's 65th Birthday : daughters expresses their feelings 'proud to be a part of your life'

बर्थडे विश / कमल हसन यांच्या 65 व्या वाढदिवशी मुलींनी व्यक्त केल्या भावना - 'तुमच्या आयुष्याचा भाग बनल्याचा गर्व आहे' 

7 ते 9 नोव्हेंबरपर्यंत चेन्नई आणि परमाकुडीमध्ये होणार वाढदिवसाचे सेलिब्रेशन 

Nov 07,2019 01:07:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : कमल हसन आपला 65 वा वाढदिवस गृहनगर परमाकुडीमध्ये साजरा करत आहेत. हे वर्ष यासाठीही विशेष आहे कारण कमल यांनी सिनेमा जगतात आपली 60 वर्षे पूर्ण केली. कमल यांच्या वाढदिवसानिमित्त परमाकुडीमध्ये तीन दिवस सेलिब्रेशन केले जाईल. ज्यासाठी ते आपल्या कुटुंबासोबत तिथे असणार आहेत. कमल यांना बर्थडे विश करत त्यांची मुलगी श्रुतीने इंस्टाग्रामवर एक खास नोट लिहिली आहे.

श्रुतीने लिहिले, 'हॅपी बर्थडे बापू जी'...

श्रुतीने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून लिहिले आहे, 'हॅपी बर्थडे बापूजी, हा वाढदिवसखूप विशेष आहे, कारण सिनेमामध्ये तुमची 60 वर्षे पूर्ण होत आहेत. आपले घर परमाकुडी यायला मिळाले. आपण हे सेलिब्रेट करत आहोत. सोबतच हेदेखील म्हणू इच्छिते की, तुमच्या आयुष्याचा एक भाग बनल्याचा गर्व आहे. पप्पा, तुम्हाला खूप खुप प्रेम.'

कमल यांची दुसरी मुलगी अक्षराने लिहिले, 'सर्वात सबसे अद्भुत पिता आणि मित्राला आनंदी वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही आम्हाला नेहमी चांगले राहण्यासाठी आणि चांगले यश मिळवण्यासाठी प्रेरित केले आहे. तुम्ही या गुणांसाठी चांगले उदाहरण आहात. मी प्रार्थना करते की, हे वर्ष तुमच्यासाठी खूप आनंद आणि यश घेऊन येवो. सोबतच तुम्हाला ते सर्व मिळो जे तुम्हाला हवे आहे.

असे असेल सेलिब्रेशन...

7 ते 9 नोव्हेंबरपर्यंत चेन्नई आणि परमाकुडीमध्ये होणाऱ्या या सेलिब्रेशनची विशेष गोष्ट ही आहे की, कमल आपले मेंटर आणि रायटर-डायरेक्टरअसलेले बालाचंदर यांच्या मूर्तीचे अनावरण करणार आहे. कमल यांनी चित्रपट सृष्टीत वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी पाऊल टाकले. चाइल्ड आर्टिस्ट म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 1960 मध्ये आला होता. हा तमिळमध्ये बनलेला चित्रपट 'कलाथुर कन्नम्मा' होता. या चित्रपटासाठी कमल यांनी राष्ट्रपती गोल्ड मेडल जिंकले होते.

X