आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kamal Khan Made Fun Of Hina Khan And Her Movie; Heena Gives Answer To KRK

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमाल खानने उडवली हिना खानची खिल्ली, चित्रपटांचीही केली थट्टा; हिनाने दिले सडेतोड उत्तर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : हिना खान रविवारी ‘बिग बॉस-१३'मध्ये आली होती. तिथे तिने आपला चित्रपट ‘हॅक्ड’चे प्रमोशन केले. यावरून केआरकेने ट्विटरवर हिना आणि तिच्या चित्रपटाची थट्टा उडवली. केआरकेने रविवारी ट्विटरवर लिहिले, ‘कुणीतरी हिनासोबत चित्रपट बनवल्याचे ऐकून मला आश्चर्य वाटले. कोण पाहील हा चित्रपट? हा चित्रपट हिना एकटीच पाहील, असे मी १०० टक्के दाव्याने सांगू शकतो.’

केआरकेचे ट्विट हिनाचा मित्र आणि टीव्ही कलावंत करणवीर बोहरालाही आवडले नाही. त्याने आपल्या मैत्रिणीची बाजू घेत उत्तर दिले, ‘केआरके भाई, तुमच्या ट्विट आणि प्रतिक्रियांची वाट पाहणारे तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत. आमचा कोणीच गॉडफादर नाही, परंतु आम्हा सर्वांची स्वप्ने आहेत आणि ती पूर्ण करण्याची आमची इच्छा आहे. हिना खानचे कौतुकच व्हायला पाहिजे.’

करणवीरच्या ट्विटनंतर हिना खाननेही केआरकेचे ट्विट पाहिले. यानंतर तिने विचारपूर्वक केआरकेला उत्तर दिले. हिनाने करणवीरच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले, ‘मला आतापर्यंत मिळालेला प्रत्येक प्रकल्प, कौतुक करणारा आजचा प्रत्येक चाहता, मी माझ्या मेहनत आणि प्रतिभेने हे मिळवला आहे. यामुळेच मला हा चित्रपट मिळाला आणि तीच गोष्ट महत्वाची आहे, पीआर ब्रोकर नाही. लोक खूप समजुतदार आहेत. ते चांगल्या कामाचे कौतुक करतात.’