आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kamal Nath Congress MLA | Kamal Nath MP Congress MLA In Jaipur Bengaluru Bhopal Latest News Updates On Jyotiraditya Scindia Rebel MLA Over Kamal Nath Govt Crisis

सिंधिया यांना उप-मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती; वाटले नव्हते ते सोडून जातील, चुकलो -दिग्विजय सिंह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • सिंधिया यांना उप-मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली तेव्हा नेमके काय झाले...
  • 22 बंडखोरांपैकी 13 आमदार काँग्रेस सोडणार नाहीत -दिग्विजय सिंह

भोपाळ / नवी दिल्ली - ज्योतिरादित्य सिंधिया गटातील 22 आमदार कुठे जातील याचा गूढ अजुनही उकलले नाही. हे सगळेच आमदार सध्या बंगळुरूत आहेत. त्यांचे मत परिवर्तन होईल या भीताने भाजपने सुद्धा खबरदारी घेतली. तसेच भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार मानेसर आणि काँग्रेसने आपले 80 आमदार जयपूरला पाठवले. काँग्रेसचे काही आमदार अजुनही भोपाळमध्येच आहेत. मध्य प्रदेशच्या राजकीय भूकंपानंतर काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी पक्ष सोडला तरीही आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. विशेष म्हणजे, काँग्रेसने सुद्धा त्यांना बर्खास्त केले नाही. याच आधारावरून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह नवीन समिकरण मांडत आहेत. त्यांच्या मते, "काँग्रेसच्या 22 बंडखोर आमदारांपैकी 13 आमदारांनी पक्षाला विश्वासात घेतले. हे आमदार काँग्रेस सोडणार नाहीत. त्यामुळे, आम्ही झोपलो किंवा शांत बसलोय असे मुळीच नाही."

सिंधिया यांना उप-मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, पण....
दिग्विजय सिंह म्हणाले, "सिंधिया काँग्रेस सोडून जातील याचा अंदाजही आला नाही. आमच्याकडून चूक झाली. सिंधिया यांना आम्ही मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. पण, ते आपल्या मर्जीतील एका माणसाला या पदावर बसवू इच्छित होते. कमलनाथ यांना सिंधियांच्या एखाद्याला चेल्याला उप-मुख्यमंत्री करून घेणे पटले नाही. काँग्रेसमध्ये राहूनही सिंधिया यांना राज्यसभेचे तिकीट मिळाले असते असेही दिग्विजय यांनी सांगितले आहे.

भाजपा, काँग्रेस आणि बंडखोर आमदरा 4 वेग-वेगळ्या शहरांमध्ये

मानेसर : भाजपचे 107 पैकी 105 आमदार हॉटेलात
भाजपकडे 107 आमदार आहेत. त्यापैकी 105 आमदार भाजपने मंगळवारी रात्री उशीरा भोपाळच्या पक्ष मुख्यलयात बोलावले. यानंतर त्यांना वेग-वेगळ्या वाहनांमध्ये बसवून विमानतळाकडे रवाना केले. त्यांना दिल्ली पाठवण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशीराच त्यांना गुडगावच्या आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये नेण्यात आले. उर्वरीत दोन आमदारांपैकी शिवराज सिंह चौहान दिल्लीत आणि नारायण त्रिपाठी आपल्या आईच्या निधनामुळे मध्य प्रदेशात आहेत.

जयपूर : काँग्रेस+ चे 94 पैकी 80 आमदार
मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निवासस्थानावर 16 तासांत दुसऱ्या वेळी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. पहिली बैठक मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता झाली. यामध्ये काँग्रेसचे 90 आणि 4 अपक्ष आमदार उपस्थित होते. दुसरी बैठक बुधवारी सकाळी 10 वाजता झाली. दोन तास चाललेल्या या बैठकीनंतर 94 पैकी 80 आमदारांना 3 बसमध्ये बसवण्यात आले आणि थेट विमानतळाच्या दिशेने रवाना करण्यात आले. आमदारांनी आपल्यासोबत ज्या कार आणल्या होत्या, त्या रिकाम्याच त्यांच्या-त्यांच्या घरी पाठवण्यात आल्या.

भोपाळ : काँग्रेसचे 14 आमदार भोपाळमध्ये
काँग्रेसने सर्वात विश्वासपात्र 14 आमदारांना भोपाळमध्ये थांबवले आहे. 26 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना भोपाळमध्ये थांबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मध्य प्रदेशच्या 3 राज्यसभा जागांवर शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

बंगळुरू : 22 बंडखोर आमदार येदियुरप्पा पुत्राच्या नजरेखाली
बंगळुरू शहरापासून 40 किलोमीटर दूर रिसॉर्ट पाम मिडोज आणि तीन वेग-वेगळ्या ठिकाणी ज्योतिरादित्य समर्थक आमदारांना ठेवण्यात आले आहे. ही जागा कर्नाटकचे भाजप आमदार अरविंद लिंबोवली यांच्या मतदार संघात आहे. सर्वच आमदारांना कमांडोजच्या प्रोटेक्शनमध्ये ठेवण्यात आले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचा मुलगा आणि खासदार बी वाय राघवेंद्र आणि विजयन यांच्या नजरेखाली या आमदारांना ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद भदोरिया सुद्धा आहेत.

बातम्या आणखी आहेत...