आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी कपूरच्या अॅक्टींगची बॉलिवूड अभिनेत्याने उडवली खिल्ली; ट्वीट करत म्हणाला - एक मिनिटाच्या जाहिरातीत तर...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता कमाल आर खान आपल्या एक ट्वीटमुळे चर्चेत आला आहे. नेहमीच निंदनीय विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या कमाल आर खानने यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूरवर निशाणा साधला आहे. कमालने नुकतेच जान्हवी कपूरच्या अभिनयाबाबत शंका उपस्थित करत एक ट्वीट केले. यामध्ये त्याने लिहिले की, 'जान्हवी कपूर, विकी कौशलसोबत एका मिनिटाच्या जाहिरातीत अभिनय करू शकत नाही, तर ती पूर्ण चित्रपटात अभिनय कसा करणार. तिच्यासाठी हे खूप कठीण काम असेल.'
 

 

'धडक'मधून केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण 
कमाल आर खानच्या या ट्वीटवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. जान्हवीने ईशान खट्टरसोबत 'धडक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रभाव पाडू शकला नाही. पण चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाचे बरेच कौतुक केले होते. 
 

गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये काम करत आहे जान्हवी 
जान्हवी सध्या भारतीय हवाई दलातील पायलट गुंजन सक्सेनाच्या बायोपिक करत आहे. याशिवाय ती 'तख्त'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती हॉरर कॉमेडी 'रूही आफ्जा'मध्ये राजकुमार रावसोबत काम करणार आहे.