आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एम्स’ साेडून ११ हजार गरिबांवर केले माेफत उपचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. कामेंद्रकुमार सिंह मी अभ्यासात सुरुवातीपासून अव्वल राहिलाे, त्यामुळे लहानपणापासून एकच स्वप्न हाेते की, माेठ्ठं हाेऊन मुंबई-दिल्लीसारख्या महानगरांत राहायला जाईन. बिहारमधील विक्रमगंज जिल्ह्यातील धारुपूर या खेड्यात सारं बालपण गेलं आणि दहावीपर्यंतचे शिक्षण फारशा सुविधा नसलेल्या सरकारी शाळेत पूर्ण केलं. आमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या इतके दुर्बल हाेते की, अतिशय मुश्किलीने वडील आमच्या गरजा भागवत असत. पुढील शिक्षणासाठी मी शहर गाठले, मनात देशभक्तीची आेढ असल्याने ‘एनडीए’च्या दाेन वेळा परीक्षा दिल्या, परंतु अपयशी ठरलाे. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्धार केला. पैसा नसल्यामुळे काही दिवसांनी बाेर्डिंग साेडावे लागले. यादरम्यान वडिलांची प्रकृती ठीक नसल्याचा निराेप आला. रात्री जेव्हा आम्ही गावातील आणि विक्रमगंजच्या डाॅक्टरांचा दरवाजा ठाेठावला तेव्हा एकानेही दार उघडले नाही. वेळीच याेग्य उपचार मिळाले नाहीत त्यामुळे वडिलांचे निधन झाले. माझा एक मित्र रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला, उपचाराअभावी ताेदेखील दगावला. त्या वेळी मी डाॅक्टर बनून गावात क्लिनिक सुरू करायचा निर्धार केला.   डाॅक्टर हाेणे हे काही साेपे काम नव्हते. आर्थिक चणचणीमुळे शिकवणी लावू शकलाे नाही. अध्ययनात मी अव्वल राहिलाे ते फायद्याचे ठरले. २००१ साली गुवाहाटीच्या मेडिकल काॅलेजमध्ये प्रवेश मिळाला. अखेर एमबीबीएस पूर्ण केेले आणि असिस्टंट प्राेफेसर बनलाे. यानंतर २००८ साली दिल्लीच्या एम्समध्ये दाेन वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले.  वडिलांसहित अन्य लाेकांचा मृत्यू मला सलत हाेता. गावामध्ये क्लिनिक सुरू करण्याचा विचार मांडला तर लाेक मला वेड्यात काढायचे. २०१० मध्ये लग्न ठरले त्या वेळी साेनमदेखील मेडिकलचे शिक्षण घेत हाेती. आम्हा दाेघांचे विचार जुळत हाेते, ही सर्वात चांगली बाब हाेती. २०१३ मध्ये एमएस पूर्ण केल्यानंतर २०१४ मध्ये गावाकडे परत आलाे आणि ‘करुणा रुग्णालय’ सुरू केले.   आमच्या पंचक्राेशीत केवळ सर्दी-खाेकल्यावर उपचार हाेत असत. अन्य आजारांवरील उपचारासाठी पाटण्यात जावे लागत असते. मी इथे आल्यापासून गावकऱ्यांवर उपचारासाेबतच शस्त्रक्रियादेखील हाेऊ लागल्या. २०१८ मध्ये पत्नी प्रसूतितज्ञ बनली. गेल्या ६ वर्षांत आम्ही ११ हजार गरीब रुग्णांवर माेफत इलाज केला आहे. त्यांना आैषधे माेफत पुरवली. आतापर्यंत सहा हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. अद्याप एकही रुग्ण आमच्याकडे दगावला नाही. आता विक्रमगंजसहित तीन ठिकाणांवर आमच्या रुग्णालयाच्या शाखा कार्यरत आहेत. गाेळीबारात जखमी झालेल्या २०० जणांना जीवदान दिले आहे. अशा लाेकांवर अगाेदर मी उपचार करताे, नंतर पाेलिस त्यांच्या पद्धतीने कारवाई करतात. धारुपूरमध्ये आम्ही नंदवाटिका आणि एक वाचनालय सुरू केले आहे. येथे आम्ही दाेघे मुलांना माेफत शिक्षण देताे. माझी पत्नी पर्यावरणविषयक कामावर अधिक लक्ष देते. एक किस्सा सांगायला मला आवडेल, २०१५ मध्ये एका लग्नघरी छतावर उभे राहून लाेक वऱ्हाडींचे स्वागत करीत हाेते. एवढ्यात छत काेसळले आणि उभे लाेक ढिगाऱ्याखाली आले. सुमारे ७० लाेक जखमी झाले. सरकारी रुग्णालयात सुविधा न मिळाल्याने लाेकांनी ताेडफाेड केली. यादरम्यान मी उपचारास सुरुवात केली हाेती. मी उपचाराची शर्थ करीत राहिलाे, परंतु काेणावर प्राणत्याग करण्याची वेळ येऊ दिली नाही. काही तासांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली आणि माझ्या कामाचे काैतुक केले. २०१८ मध्ये विक्रमगंज चाैकात रात्री दीड वाजता रस्ते अपघातात ट्रकने जीपचा चक्काचूर केला. अपघातातील जखमीवर घटनास्थळी आॅपरेशन करून उपचार सुरू केले. रक्तही तेथेच दिले. दाेन तासांनी गॅस कटर घेऊन लाेक आले, परंतु ताेपर्यंत उपचार मिळाले नसते तर जखमीने प्राण साेडला असता.

शब्दांकन : अजितकुमार सिंह