आज सूर्यास्तानंतर तुळशीसमोर करा या 1 मंत्राचा उच्चार, सर्व अडचणी दूर होऊ शकतात
मंगळवार 7 ऑगस्टला आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. या तिथीला कामिका एकादशी म्हणतात.
-
मंगळवार 7 ऑगस्टला आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. या तिथीला कामिका एकादशी म्हणतात. आषाढ मासातील एकादशीला श्रीविष्णू, महालक्ष्मी आणि तुळशीची विशेष पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी करण्यात आलेल्या उपायांनी सर्व अडचणी दूर होऊ शकतात. जाणून घ्या, मंगळवारी तुळशीची कशाप्रकारे पूजा करू शकता...
तुळस पूजेमध्ये करा हे 3 काम
> संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. तुळशीला स्पर्श करू नये.
> संध्याकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात.
> तुळशीसमोर तुळस मंत्राचा जप करावा.
मंत्र - वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी।
पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।।
एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम।
य: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।।
कमीत कमी 108 वेळेस हा जप करावा. यासाठी कमळगट्टाची माळ वापरावी.
या मंत्राने दूर होऊ शकतात अडचणी
तुळशीच्या या मंत्राचा रोज जप केल्याने तुळस, भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. घरामध्ये सुख-शांती राहते आणि अडचणी दूर होतात.
तुशीजवळ ठेवा शाळीग्राम
घरातील तुळशीजवळ शाळीग्राम अवश्य ठेवावा. शाळीग्राम भगवान विष्णूंचे एक रूप आहे. तुळशीसोबतच शाळीग्रामची रोज पूजा करावी.श्रीविष्णू आणि महालक्ष्मी कृपेसाठी करा हे उपाय
> भगवान विष्णूंना पिवळे फळ अर्पण करावे.> श्रीहरीला पिवळे वस्त्र अर्पण करावेत.
> दक्षिणावर्ती शंखाने देवाचा अभिषेक करावा.
> देवी लक्ष्मी पूजेमध्ये गोमती चक्र, पिवळी कवडी, कमळगट्टाची माळ ठेवा.