Home | Jeevan Mantra | Dharm | Kamika Ekadashi and tuesday hanuman measures

भाग्य बाधा दूर करण्यासाठी मंगळावर आणि एकादशीच्या शुभ योगात करा हे सोपे उपाय

रिलिजन डेस्क | Update - Aug 07, 2018, 12:01 AM IST

आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशी कामिका एकादशी म्हणतात. यावेळी 7 ऑगस्टला मंगळवारी ही एकादशी आहे.

 • Kamika Ekadashi and tuesday hanuman measures

  आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशी कामिका एकादशी म्हणतात. यावेळी 7 ऑगस्टला मंगळवारी ही एकादशी आहे. आषाढ महिन्यात एकादशी आणि मंगळवारचा योग जुळून येणे अत्यंत शुभ मानले जाते. मंगळवार हा हनुमान उपासनेचा दिवस आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार एकादशी आणि मंगळवार योगात हनुमानाचे काही खास उपाय केल्यास व्यक्तीच्या भाग्य बाधा दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, काही खास उपाय...


  1. मंगळवारी एखाद्या हनुमान मंदिरात जाऊन रामरक्षा स्तोत्राचे पाठ करावेत. त्यानंतर हनुमानाला गुळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा. आयुष्यातील सर्व समस्या या उपायाने दूर होऊ शकतात.


  2. मंगळवारी घरामध्ये पारद (एक प्रकारचा विशेष धातू) हनुमानाची मूर्ती स्थापन करावी. पारदला रसराज म्हटले जाते. तंत्र शास्त्रानुसार पारद हनुमान मूर्तीची पूजा केल्याने सर्व अर्पूर्ण कामे पूर्ण होतात. ही मूर्ती घरात ठेवल्याने सर्वप्रकारचे वास्तुदोष नष्ट होतात तसेच घरातील वातावरण शुद्ध होते. जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्याने दररोज पारद हनुमान मूर्तीची उपासना करावी.


  3. मंगळवारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि हनुमान दोघांच्याही मूर्ती असलेल्या मंदिरात जावे. मंदिरात गेल्यानंतर श्रीराम आणि हनुमानाच्या मूर्तीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. या उपायाने भगवान श्रीराम आणि हनुमान दोघांचीही कृपा प्राप्त होते.


  4. मंगळवारी हनुमानाला गोड पान अर्पण करावे. पानामध्ये चुना आणि सुपारी टाकू नये. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


  5. मंगळवारी सकाळी स्नान केल्यानंतर हनुमानाची पूजा करून 7 वेळेस हनुमान चालीसाचा पाठ करावा.

Trending