Home | Jeevan Mantra | Dharm | Kamika Ekadashi Tulsi Mantra

7 ऑगस्टला एकादशी+मंगळवार योग, सुख-समृद्धीसाठी करा हा सोपा उपाय

रिलिजन डेस्क | Update - Aug 06, 2018, 12:52 PM IST

आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. धर्म शास्त्रानुसार, जो मनुष्य या दिवशी भगवान विष्णूंची पूजा

 • Kamika Ekadashi Tulsi Mantra

  आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. धर्म शास्त्रानुसार, जो मनुष्य या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतो, त्याच्याकडून देवता, गंधर्व आणि सूर्य इ. सर्वांची पूजा होते. यावेळी कामिका एकादशी 7 ऑगस्टला मंगळवारी आहे.


  व्रत विधी
  - एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून सोवळ्यात व्हावे. त्यानंतर भगवान विष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालावे.
  - त्यानंतर देवाला गंध (अबीर, गुलाल, अत्तर) अक्षता, फुल अर्पण करावे. धूप-दीप लावून आरती करावी.
  - यानंतर भगवान विष्णूंना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये तुळस अवश्य टाकावी. शेवट क्षमा याचना करून देवाला नमस्कार करावा.
  - सर्वात शेवटी विष्णू सहस्त्रनामचा पाठ अवश्य करावा आणि भक्तांना प्रसाद वाटावा.
  - व्रताच्या दिवशी काहीही खाऊ नये. उपवास करावा.
  - फलाहार करू शकता. पिण्याच्या पाण्यामध्ये तुळस टाकू शकता.


  एकादशीला करावा हा उपाय...
  कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर घरातील महिलेने तुळशीची पूजा करून गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करावा. या उपायाने घरामध्ये सुख-शांती कायम राहते आणि सर्व दोष दूर होतात.


  मंत्र
  महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी
  आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।।

Trending