आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kamlesh Tiwari Assassinated By Comments On The Prophet; Three Masterminds Caught In Surat

पैगंबरांवरील टिप्पणीमुळे कमलेश तिवारींची हत्या; सुरतमध्ये पकडले तीन मास्टरमाइंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेश पोलिसांनी हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येचा २४ तासांत उलगडा केल्याचा दावा केला आहे. पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, मोहंमद पैगंबर यांच्याबाबत २०१५ मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिवारींची हत्या करण्यात आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा कट दोन महिन्यांपूर्वी दुबईत रचण्यात आला होता. घटनास्थळी मिळालेल्या मिठाईच्या डब्याच्या आधारावर लखनऊपासून सुमारे १२५० किमी अंतरावरील सुरत येथून गुजरात एटीएसने मौलाना मोहसीन सलीम शेख, फैजान युनूसभाई जिलानी आणि रशीद अहमद खुर्शीद अहमद पठाण या तिघांना अटक केली आहे. दुबईत राहिलेल्या रशीदला संगणकाची माहिती आहे. तो शिलाई काम करतो. मौलाना मोहसीन सलीम शेख याच्या चिथावणीवरूनच २३ वर्षीय रशीदने सुरुवातीचा कट रचला होता. सुरतच्या दुकानातून मिठाई खरेदी करताना फैजान युनूस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्याच्यानंतर मौलाना मोहसीन आणि रशीदला पकडण्यात आले. 

सूत्रांनुसार, रशीदनेच अश्फाक आणि मोइनुद्दीन नावाच्या शूटरला तिवारींच्या हत्येची सुपारी दिली होती. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही मारेकऱ्यांनी १६ आॅक्टोबरला सुरत येथून मिठाईचा डबा खरेदी केला आणि त्यात पिस्तूल ठेवून गुजरात येथून रेल्वेने लखनऊला पोहोचले. मात्र, दोन्ही मारेकऱ्यांना अद्याप अटक झाली नाही. पोलिस महासंचालक सिंह म्हणाले की, या दोघांना लवकरच अटक केली जाईल. या घटनेत कुठलीही दहशतवादी संघटना सहभागी असल्याचे पुरावे अद्याप मिळाले नाहीत.
 

तिवारींच्या आईने भाजप नेत्यावर केला हत्येचा आरोप
कमलेश तिवारींच्या आईने सीतापूर येथील भाजपचे नेते शिवकुमार गुप्ता यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे. आईने म्हटले आहे की, गुप्ता हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे आणि त्याच्यावर ५०० पेक्षा जास्त खटले आहेत. एका मंदिराबाबत सुरू असलेल्या वादातून त्याने ही हत्या घडवली आहे.
 
 

तिवारींवर दीड कोटी रुपयांचे बक्षीस ठेवणाऱ्या दोन मौलानांनाही केली अटक
तिवारींची पत्नी किरण यांनी उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथील दोन मौलानांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला होता. या दोघांनी वादग्रस्त वक्तव्यावरून तिवारींचे शिर कापण्यासाठी दीड कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पोलिसांनी मोहंमद मुफ्ती नईम काझमी आणि इमाम मौलाना अनवरूल हक यांना अटक केली आहे. त्यांचीही सखोल चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...