आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

काम्या पंजाबी एकेकाळी होती लग्नाच्या विरोधात, आता शलभ डांग याच्यासोबत करणार आहे दुसरे लग्न 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : 'शक्ती एक अस्तित्व के अहसास' शोची प्रीतो म्हणजेच काम्या पंजाबी दुसरे लग्न करणार आहे. पहिले लग्न मोडल्यानंतर प्रेम आणि लग्न या संकल्पनेमुळे नाराज झालेली काम्या, दिल्लीच्या शलभ डांगसोबत पुढच्यावर्षी लग्न करणार आहे. शलभसोबत काम्याची भेट फेब्रुवारी 2018 मध्ये झाली होती.  
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Blessed 🙏🏻❤️ @shalabhdang

A post shared by Kamya Panjabi (@panjabikamya) on

 

काम्या म्हणाली मी प्रेमात वेडी झाले आहे... 
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत काम्याने आपल्या लग्नाबद्दल स्वतः कन्फर्म केले आहे. काम्याने सांगितले, "मी पुढच्यावर्षी एक विवाहित महिला बनेल. मी शलभला फेब्रुवारीमध्ये भेटले होते. आमचे बोलणे झाले आणि दीड महिन्यातच त्याने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. पुन्हा लग्न करणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळे मी विचार करण्यासाठी वेळ घेतला. अयशस्वी लग्न आणि मन मोडल्यानंतर मी लग्न आणि प्रेम यांबद्दल विचार करत नव्हते. एक वेळ अशी आली होती जेव्हा मी याच्या विरोधात होते. पण शलभने मला प्रेम आणि लग्नावर पुन्हा विश्वास करायला शिकवले. मी आता एका 16 वर्षांच्या मुलीप्रमाणे आहे, मी त्याच्या प्रेमात वेडी झाले आहे.”
 

9 वर्षांच्या मुलीची आई आहे काम्या... 
काम्या पंजाबीचे पहिले लग्न बिजनेसमन बंटी नेगीसोबत झाले होते, पण दोघांचे नाते चालले नाही आणि 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांची एक 9 वर्षांची मुलगी आरा हीदेखील आहे. जी सध्या आपल्या आईसोबत राहाते. 
 

0