आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीर जवानांना सलाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण सामान्य लोक संसार करताना आपलं पूर्ण आयुष्य छोट्या-मोठ्या भांडणात, ऐशोआराम, संपत्त कमावण्यातच घालवतो. देशाचे संरक्षण करता-करता शहीद होणाऱ्या जवानांचा विचार आपण किती वेळेस विचार करतो? स्वत:चा संसार उघड्यावर सोडून देश सुरक्षित राहावा, यासाठी खंबीरपणे हसतमुखाने सीमेवर भारतभूचे संरक्षण करताना शहीद होतात. आपण त्यांची कितीदा आठवण काढतो? आपण त्यांच्यापासून नि:स्वार्थपणे काम करण्याची प्रेरणा घ्यायला हवी. 


लग्नसमारंभ, वाढदिवस, साखरपुडा अशा कौटुंबिक कार्यक्रमांत आपण आनंदाने नाचतो, जल्लोष करतो. थाटामाटात कार्यक्रम साजरे करतो. त्या वेळी छातीवर बंदूक व शरीरावर बाॅम्बहल्ल्याचा घाव झेलणारे आपले जवान. त्यांच्या कार्याचं, बलिदानाचं, समर्पणाचं कौतुक करावं तेवढ कमीच. परिस्थिती कितीही वाईट, भयावह असली तरीही ते देशाच्या संरक्षणासाठी ढाल बनतात. ठराविक कालावधीसाठी ते सुटी घेऊन गावी येतात, पण सीमेवर परिस्थिती बिकट झाली की आहे त्या परिस्थतीत सुट्या रद्द करून मातृभूमीच्या संरक्षणासाठी परतात. आपल्या ठरलेल्या कार्यक्रमात विघ्न आलं, कार्यक्रम रद्द झाला की किती वाईट वाटतं आपल्याला. काही दिवसांसाठी सुटीवर येणाऱ्या जवानांना जेव्हा अचानक परतावं लागत असेल तेव्हा त्यांना काय वाटत असेल? 
जड पावलांनी आणि पाणावलेल्या डोळ्यांनी जेव्हा जवान परिवाराचा, आप्तजनांचा निरोप घेऊन, भेटून निघत असतील तेव्हा त्यांच्या मनात काय येत असेल? तो निरोप ते शेवटचा निरोप समजत असतील का? पण त्यांना आणि त्यांच्या कुटबीयांना उमेद असते त्यांच्या परिवाराजवळ परतण्याची. निरोप घेऊन ताठ मानेने, अभिमानाने त्यांची पावले चालतात मातृभूमीच्या संरक्षणासाठी. परत येण्याची कसलीच श्वाश्वती नसते तरीही. तीच खरी सत्कर्मी पावलं...

बातम्या आणखी आहेत...