आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kanchli The Last Film On The Story Of Vijayadan Detha, Sanjay Mishra Will Be Seen In Pivotal Role

विजयादान देथांच्या कथेवर आधारित शेवटचा चित्रपट 'कांचली', संजय मिश्रा दिसणार खास भूमिकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 'पहेली' या चित्रपटाचे लेखक विजयदान देथांचा शेवटचा चित्रपट 'कांचली'मध्ये अभिनेता संजय मिश्रा एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहेत.   बॉलिवूडमध्ये आतापर्यंत विजयदान देथा यांच्या कथांवर हबीब तनवीर यांनी 'चरणदास चोर', प्रकाश झा यांनी 'परिणीती', मणि कौल यांनी 'दुविधा' आणि अमोल पालेकर यांनी शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्यासारखे 'पहेली' हे चित्रपट बनवले आहेत. आता विजयदान देथा यांच्या कथेवर "कांचली" हा चित्रपट येत आहे. यामध्ये हरहुन्नरी अभिनेते संजय मिश्रा आणि नवोदित शिखा मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

म्हणून असेल शेवटचा चित्रपट : 10 नोव्हेंबर 2013 रोजी विजयदान देथा यांचे निधन झाले म्हणून त्यांच्या कथेवरील हा शेवटचा चित्रपट असेल. या चित्रपटाचे सर्वात रंजक पात्र संजय मिश्रा असून हिंदी-इंग्लिशमध्ये बोलणा-या भोजाचे पात्र साकारणार आहेत. चित्रपटाच्या अनेक दृश्यांमध्ये ते पोपटाशी संवाद साधताना दिसणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ रंगकर्मी ललित परिमू आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे पदवीधर नरेशपालसिंग चौहानदेखील दिसणार आहेत, तर शिखा मल्होत्रा ​​कजरीच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. शिखा बॅरी जॉन अ‍ॅक्टिंग स्कूलमधून पासआऊट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन दैदिप्य जोशी यांनी केले आहे.