आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेंढवा दुर्घटना : अगरवाल बंधूंनी ढकलली दुसऱ्या बिल्डरवर जबाबदारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कोंढवा भागात शुक्रवारी संरक्षक भिंत काेसळून १५ बांधकाम मजूर ठार झाले हाेते. या प्रकरणी सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पाेलिसांनी ‘अल्कॉन स्टाइलस’ इमारतीच्या दाेन बिल्डर भावांना अटक केली हाेती. पाेलिस काेठडी संपल्यानंतर मंगळवारी त्यांंना लष्कर न्यायालयासमाेर हजर करण्यात अाले, तेव्हा त्यांची काेठडी ६ जूनपर्यंत वाढवण्यात अाली. विवेक सुनील अगरवाल (२०) व विपुल सुनील अगरवाल (३२) अशी या अाराेपींची नावे अाहेत.


न्यायालयासमाेर युक्तिवाद करताना अगरवाल यांच्या वकिलांनी या दुर्घटनेची जबाबदारी अामच्या अाशिलांची नसून शेजारी बांधकाम सुरू असलेल्या कांचन बिल्डर्सची असल्याचा दावा केला. तसेच बांधकाम सुरू असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही याच बिल्डरची असल्याचे त्यांनी सांगितले. तर उघड्यावर, झाडाखाली, नाल्याजवळ, तसेच संरक्षक भिंतीलगत मजुरांची निवासस्थाने उभारू नयेत, अशा सूचना मनपा प्रशासनाने दिलेल्या असतानाही ‘अल्काॅन स्टाइलस’च्या संरक्षक भिंतीजवळ बांधकाम मजुरांची घरे उभारलेली असताना त्याबाबत कांचन बिल्डर्सना कळवण्याची तसदी अगरवाल यांनी घेतली नसल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. 


दाेन्ही बाजू एेकल्यानंतर न्यायालयाने दुर्घटनेचा अधिक तपास करण्यासाठी दाेन्ही अाराेपींची पाेलिस काेठडी चार दिवसांनी वाढवण्याचे अादेश दिले. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अाराेपींपैकी सहा जण अद्याप फरार अाहेत. पाेलिस त्यांचा शाेध घेत अाहेत. 


तिघांचे अटकपूर्व जामिनाचे अर्ज कोर्टाने फेटाळले
या प्रकरणात कांचन बिल्डर्स कंपनीचे रश्मीकांत गांधी, पंकज व्हाेरा, सुरेश शहा यांच्यावरही गुन्हे दाखल झाले असून ते फरार अाहेत. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी पुणे न्यायालयात अर्ज केले हाेते. मात्र न्यायाधीश एम.एम. देशपांडे यांच्या न्यायालयाने ते मंगळवारी फेटाळले.

बातम्या आणखी आहेत...