आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kaneru Hampi Is India's First Female World Champion, Second To Win Gold, Vishwanathan Anand Is First.

बुद्धिबळ हम्पीने मुलाच्या जन्मानंतर घेतला हाेता दाेन वर्षांपर्यंत ब्रेक; पुनरागमन करताना पहिली महिला वर्ल्ड चॅम्पियनचा मिळवला बहुमान

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोनेरू हम्पी बुद्धिबळात भारताची पहिलीच महिला विश्वविजेती, वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकली
  • वयाच्या पाचव्या वर्षी तरबेज; बाॅयज टायटल जिंकणारी पहिली
  • 32 वर्षीय हप्पीने चीनच्या २२ वर्षीय खेळाडूला हरवले

मॉस्को : काेनेरू हम्पी ही भारताची सर्वात चर्चेत राहिलेली बुद्धिबळपटू आहेे. तिने याच खेळापुरतीच आपली अाेळख मर्यादित ठेवली नाही. तिने आपल्यातील कुशलेच्या बळावर भारताच्या क्रीडा विश्वात आपला ठसा उमटवला आहे. भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर हाेण्याचा विक्रमही काेनेरू हम्पीच्या नावे नाेंद आहे. याच्या बळावर तिने बुद्धिबळाच्या खेळात आपली वेगळी अाेळख निर्माण केली. याच यशाने आत्मविश्वास दुणावलेल्या हम्पीने पुढे विक्रमाचा पल्ला गाठण्याची अापली लय कायम ठेवली. यातूनच ती २६०० ईएलओ गुण संपादन करण्याचा पराक्रम गाजवला. यासह तिच्या नावे हा गुणांचा पल्ला गाठणारी जगातील दुसरी महिला बुद्धिबळपटू हाेण्याचा विक्रमही नाेंद झाला आहे. तिला बालपणापासूनच आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या बळावर याच खेळात यशाचा माेठा पल्ला गाठण्याचे बळ मिळाले. वडील अशाेक यांच्या माैलिक मार्गदर्शनामुळे तिच्यातील बुद्धिमत्तेला माेठी चालना मिळाली. यातूनच तिने वयाच्या पाचव्या वर्षीया खेळात ठसा उमटवण्याच्या माेहिमेला सुरुवात केली. तिला यासाठी सुरुवातीला घरीच वडील अशाेक यांनी यासाठीचे तंत्रशुद्ध असे प्रशिक्षण दिले. या खेळातील डावपेच आणि कुशल चाली तिने अल्पवाधीत आत्मसात केल्या. तिच्यातील हीच प्रगल्भता वडिलांनी हेरली. त्यांनी यासाठी प्राध्यापकाची माेठ्या पगाराची नाेकरी साेडून देण्याचा धाडसी निर्णय घेतला. वडिलांच्या याच त्यागाचे महत्व लक्षात घेऊन तिनेही यशाचा पल्ला गाठण्यासाठीची कुठलीही कसर साेडली नाही. यातूनच तिला राज्य, राष्ट्रीय आणि अांतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी अाेळख निर्माण केली. अव्वल कामगिरीमध्ये सातत्य कायम ठेवताना तिने हा पल्ला गाठला आहे.

विश्वनाथननंतर भारताची दुसरी वर्ल्ड चॅम्पियन

मॉस्को : भारताच्या ३२ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू काेनेरू हम्पीने शनिवारी रात्री एेतिहासिक कामगिरीची नाेंद केली. तिने माॅस्काेच्या लुझनिक स्टेडियमच्या व्हीआयपी झाेनमध्ये चीनच्या २२ वर्षीय लेई तिरंगीला पराभूत केले. यासह काेरून हम्पी ही भारताची पहिली महिला वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. तिने १२ फेऱ्यांची रॅपिड चॅम्पियनशिप जिंकून हा एेतिहासिक यशाचा बहुमान पटकावला आहे. यादरम्यान ३२ वर्षीय हम्पीने १२ राऊंडच्या या चॅम्पियनशिपमधील सात फेऱ्यात शानदार विजयाची नाेंद केली. आता काेनेरू हम्पी ही विश्वनाथन आनंदनंतर भारतामधील दुसरी वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळपटू ठरली. तिने वयाच्या ३२ व्या वर्षी भारताची पहिली महिला वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा इितहास रचला आहे. यासह तिला या बहुमान आपल्या नावे करता आला. याच स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर द्राेणावल्ली हरिका ही १३ व्या स्थानावर राहिली.

अाताच्या या स्पर्धेतील काेेनेरू हम्पीची कामगिरी काैतुकास्पद ठरली. तिने या स्पर्धेच्या सात फेऱ्यामध्ये चुरशीची खेळी करताना अव्वल चालीच्या बळावर विजयाची नाेंद केली. हीच लय कायम ठेवल्याने तिला या विक्रमी यशाचा पल्ला गाठता अाला अाहे.