Home | News | Kangana after arguing with a journalists now shared a video shared and said, 'I want you to bane me ...'

कंगना आणि पत्रकारांचा वाद आता आणखी चिघळणार का ? कंगनाने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली - 'माझी इच्छा आहे तुम्ही मला बॅन करावे...'

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 11, 2019, 12:07 PM IST

कंगना म्हणाली देशद्रोह्यांसाठी माझ्याकडे जराही सहनशीलता नाही 

  • Kangana after arguing with a journalists now shared a video shared and said, 'I want you to bane me ...'

    एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट आणि पत्रकार संघातील वाद अद्यापही थांबला नहिये, उलट हा वाद वेळेनुसार आणखीच वाढत चालला आहे. हा वाद एवढा वाढला आहे की, एंटरटेनमेंट गिल्ड ऑफ इंडियाने कंगनाला तिच्या चुकीच्या वर्तनामुळे बॅन केले आहे, ज्याबद्दल अशातच कंगनाने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनाने भारतीय मीडियाबद्दल बोलताना काही पत्रकारांना देशद्रोही, दोन्ही बाजूंनी बोलणारे आणि काही पैशांमध्ये विकले जाणारे असे संबोधले. याव्यतिरिक्त कंगनाने आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्याही जर्नलिस्टचे नाव न घेता काही आरोपही केले आहेत. कंगनाने या व्हिडिओमध्ये आधी मीडियातीळ काही लोकांनी प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद म्हणले. पण यानंतर कंगनाने मीडियाएका समूहाविषयी म्हंटले की, हा भाग ढेकूणसारखा देशाच्या आत्मसन्मानाला घाव घालणारा आहे. ती पुढे म्हणाली, 'हा मीडिया देशासाठी घाणेरडे, बीभत्स विचार पसरवत आहे, सोबतच देशद्रोहाला प्रोत्साहन देऊन देशाच्या एकतेवर प्रहार करत आहे.'

    व्हिडिओमध्ये कंगनाने सांगितले की, एका जर्नलिस्टला माझ्या कामाची, इव्हेंटची आणि चित्रपटांची खिल्ली उडवताना पहिले होते. यांच्याकडे कोणताही तर्क-वितर्क किंवा विचार नाहीत, हे तर केवळ फुकटचे जेवण करण्यासाठी प्रेस कॉन्फ्रेंसला येतात.' एवढेच नाही तर, कंगनाने आपल्या व्हिडिओमध्ये त्यांना नालायक आणि 50 रुपयांत विकले जाणारे पत्रकारदेखील म्हणले. आपल्या व्हिडिओमध्ये कंगना रनोटने मीडियाला स्वतःला बॅन करण्याबद्दल सांगितले आणि म्हणाली की, 'माझी इच्छा नाही की, माझ्यामुकले तुमच्या घरात चूल पेटावी, त्यामुळे मला बॅन करा...'

    would like your attention. This is important. Listen up!

    A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

Trending