आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टोबरपर्यंत 'अम्मा'च्या भूमिकेसाठी पूर्णपणे तयार होईल कंगना, बॉलिवूड - टॉलिवूड इंडस्ट्रीमधून होईल कलाकारांचे कास्टिंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अनेक वादांच्या भोवऱ्यात अडकलेली असूनही कंगनाकडे मेगा बजेट चित्रपटांची काहीही कमी नाही. 'मणिकर्णिका..' नंतर आता ती आणखी एक मेगाबजेट चित्रपट जयललिता यांच्या बायोपिकला सुरुवात करणार आहे. सध्या ती मनालीमध्ये आहे. जिथे ती या चित्रपटाचे रीडिंग करत आहे. 9 ऑगस्टला ती मुंबईला परतणार आहे आणि चित्रपटाची उर्वरित तयारीचे काम सुरु करणार आहे. चित्रपटाचे बजेट 80 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट 'जजमेंटल है क्या' चे को- प्रोड्यूसर असलेले शैलेश आर सिंह प्रोड्यूस करत आहेत. त्यामुळे चित्रपटात दोन्ही इंडस्ट्रीतील कलाकार असतील कारण ही कथा जयललिता यांची आहे, ज्या साउथच्या सुपरहिट अभिनेत्री आणि नंतर तिथल्या आवडत्या सीएमदेखील होत्या. अशात मग मेकर्स फिल्मला तेथील टच देण्यासाठी टॉलीवुडच्या कलाकारांचे कास्टिंग करणार आहेत. मात्र हा चित्रपट दोन भाषांमध्ये (तमिळ आणि हिंदी) बनत आहे. हेदेखील कारण आहे की, दोन्ही इंडस्ट्रीजचे कलाकार कास्ट केले जात आहेत. साउथचे प्रसिद्ध स्टार्सदेखील ऑन बोर्ड घेतले जात आहेत. 

 

प्रोड्यूसर शैलेश आर. सिंह यांनी सांगितले, 'हा एक मेगा बजेट चित्रपट आहे. यासाठी कंगनाला 21 कोटी रुपये दिले जात आहेत. चित्रपटाच्या मेकिंगचे बजेट 80 कोटींपेक्षा जास्तच राहणार आहे. ती या चित्रपटाच्या तयारीला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात करणार आहे.’  

 

चित्रपट 'धाकड' मध्येदेखील करणार आहे दमदार अॅक्शन... 
जयललिता यांच्या बायोपिकांव्यतिरिक्त कंगनाकडे 'धाकड' सारखा मेगा बजेट चित्रपट देखील आहे. ती यामध्ये हार्डकोर अॅक्शन करताना दिसणार आहे.  कंगना म्हणते, 'धाकड' मध्ये मी पुन्हा एकदा अॅक्शन करताना दिसणार आहे. कदाचित हा चित्रपट मला 'मणिकर्णिका' मुळे मिळाला असेल. लोकांनी जेव्हा राणी लक्ष्मीबाई म्हणून मला स्क्रीनवर अॅक्शन करताना पहिले आणि टाळ्या वाजवल्या तेव्हा माझा विश्वास बसला की, 'धाकड' मध्येदेखील प्रेक्षकांना मला अॅक्शन करताना पाहणे आवडेल. अपक्ष आहे की, पुढे प्रेक्षक फीमेल सुपर हीरोलादेखील एक्सेप्ट करतील.' 

 

आता आला आहे अभिनेत्रींचा काळ - कंगना... 
आता असा काळ आला आहे, जेव्हा केवळ अभिनेत्रींवरही मोठी रक्कम लावली जाऊ शकते आणि त्याची रिकव्हरीदेखील शक्य आहे. माझे 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' आणि 'मणिकर्णिका' दोन्ही मोठ्या बजेटचे वुमन सेंट्रिक चित्रपट होते. तरीही दोन्हींनी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. आज मोठे मेकर्सदेखील अभिनेत्रींवर मोठा पैसे लावत आहेत. 

 

फीमेल बायोपिक जे आतापर्यंत चर्चेत राहिले... 
'द डर्टी पिक्चर' (2011)
'मेरीकॉम' (2014)
'नीरजा' (2016)
'हसीना' (2018)
'मणिकर्णिका' (2019)