आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kangana Dedicates Award To Women Of The Country, Nina Gupta Wishes Everyone The Best

कंगनाने देशाच्या महिलांना समर्पित केला अवॉर्ड, नीना गुप्ता यांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वी पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली, ज्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीच्या चार दिग्गजांची नावे सामील आहेत. पद्मश्री अवॉर्ड मिळवणाऱ्यांमध्ये कंगना रनोट, करण जोहर, अदनान सामी आणि एकता कपूर आहे. अवॉर्ड्सच्या घोषणेनंतर कंगनाने व्हिडिओद्वारे आभार व्यक्त केले. तर नीना गुप्ता यांनी या कलाकारांना सन्मान मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.  

कंगना रनोटचा चित्रपटसृष्टीतील प्रवास प्रेरणा देणारा आहे. हिमाचलच्या छोट्याशा भागातून मुंबईला येऊन तिने स्वबळावर स्वतःला एका उंचीवर नेले. यश संपादित केले. कंगनाव्यतिरिक्त एकता कपूर, करण जोहर, अदनान सामी, सुरेश वाडकर आणि सरिता जोशी यांनाही पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत.  

कंगनाने व्यक्त केला आनंद... 

कंगना रनोटचे म्हणणे आहे, "मी पद्मश्री सन्मान देशातील प्रत्येक आई-मुलीला समर्पित करते. मी माझ्या देशाला धन्यवाद म्हणू इच्छिते. ज्यांनी मला हा सन्मान दिला. हा पुरस्कार मी त्या प्रत्येक महिलेला समर्पित करू इच्छिते. ज्याच्यामध्ये स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आहे. हा पुरस्कार त्या प्रत्येक आई आणि महिलेसाठी आहे, ज्या या देशाला उत्तम बनवण्यासाठी मदत करतात."

नॅशनल अवॉर्ड्स विनर आहे कंगना... 

'फॅशन', 'क्वीन' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' साठी कंगनाला तीनवेळा नॅशनल अवार्डने सन्मानित केले गेले आहे. अशातच रिलीज झालेल्या 'पंगा' साठीही तिची खूप चर्चा होत आहे. जयललिता यांचा बायोपिक 'थलाइवी' मध्येही तिने लीड भूमिका साकारली आहे. तिने रॉनी स्क्रूवालाच्या बॅनरचा एक चित्रपट साइन केला आहे. ज्यामध्ये ती पायलटच्या रोलमध्ये दिसणार आहेत.   

अक्षय-अजयचे नावही होते सामील... 

दिल्लीच्या सूत्रांनी सांगितले की, पद्मश्रीच्या शर्यतीत अजय देवगण आणि अक्षय कुमारची नावेही पुढे आली होती. पण फायनली कंगना रनोटच्या नावावर मोहोर लागली. हा पुरस्कार प्रत्येक वर्षी मार्च-एप्रिलमध्ये दिला जातो.  

खुश आहे अश्विनी अय्यर... 

'पंगा' चित्रपटाची डायरेक्टर अश्विनी अय्यर तिवारीने आपल्या आणि टीमच्या वतीने कंगनाचे आभार मानले. ती म्हणाली, "कंगनाने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये यश संपादित केले आहे. ती खूप साऱ्या अवॉर्डसाठी पात्र आहे. मी खूप खुश आहे की, तिला पद्मश्री पुरस्कारासाठी निवडले गेले. या अवॉर्डने देशाच्या त्या महिलांना प्रोत्साहन मिळेल, ज्यांना आपला मार्ग स्वतः बनवायचा आहे आणि आपली स्वप्ने साकार करायची आहेत."

बातम्या आणखी आहेत...