आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना रनोट बनली बॉलीवूडची सगळ्यात महागडी हीरोइन, एका चित्रपटासाठी मिळाले इतके कोटी की, त्यात \'विकी डोनर\' सारखे पाच चित्रपट बनतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  'मणिकर्णिका' च्या यशानंतर कंगनाला अजून एक मोठा चित्रपट मिळाला आहे. कंगनाला अॅक्ट्रेस आणि पॉलिटिशिअन राहिलेल्या जयललिता यांच्या बायोपिकची ऑफर आली आहे, ज्यात कंगनाला 24 कोटी रूपये मानधन मिळणार असल्याच समोर आलंय. कंगनाला ऑफर झालेल्या या फीसनंतर कंगना बॉलीवूडची सगळ्यात महागडी हीरोइन बनली आहे. 23 मार्चला कंगनाच्या वाढदिवसाच्या दिवशी घोषणा झाली होती, की ती जयललिता यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. हा चित्रपट तमिळमध्ये 'थलायवी' नावाने तर हिंदीत 'जया' नावाने बनेल. दीपिका आणि प्रियंकालाही कंगनाने मागे टाकले आहे.


2017 मध्ये इंटरनॅशनल स्टार प्रियंका चोप्रा बॉलीवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारी अॅक्ट्रेस बनली होती. तेव्हा तिला एका चित्रपटासाठी 10 कोटी मिळत होते. पण प्रियंकाचा हा रेकॉर्ड दिपीकाने तोडला, तिला 'पद्मावत'साठी 11 कोटी रूपये मिळाले होते. पण जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगनाला मिळालेली फीस दिपीकाच्या सध्याच्या फीसपेक्षा दुप्पट आहे. यापूर्वी कंगनाला 'मणिकर्णिका' साठी 14 कोटी रूपये मिळाले होते.


कंगनाला मिळाला लीड रोल
जेव्हा बॉलीवूडचा कोणताही कलाकार साउथमध्ये काम करतो, तेव्हा त्याला साउथच्या टॉप अॅक्टरसोबत काम करावे लागते. पण कंगनाच्या बाबतीत असे नाहीये. कंगना बॉलीवूडची अॅक्ट्रेस असूनदेथील जयललिता यांच्या बायोपिकमध्ये लीड रोल प्ले करणार आहे. जयललिता यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन ए.एल. विजय करत आहे. विजय साउथच्या उत्कृष्ठ दिग्दर्शकांमध्ये आहे, तर या चित्रपटाची कथा  'बाहुबली'चे लेखक के.व्ही. विजयेन्द्र प्रसाद यांनी लिहीली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...