आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना कंगनाने दिले कडक उत्तर, म्हणाली - 'जोपर्यंत दाखवणार नाही तोपर्यंत समोरच्याला कसे कळेल की, तुमच्यामध्ये काय आहे' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कंगना रनोटची फिल्म मणिकर्णिका 25 जानेवारीला रिलीज होत आहे. फिल्ममध्ये कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारत आहे. फिल्मच्या म्युझिक लॉन्चवर कंगनाला तिच्या देशभक्ति आणि राष्ट्रप्रेम याविषयी प्रश केला गेला. कंगनाला विचारले गेले की, फिल्म करतांना तुमच्यामध्ये देशभक्तीची भावना कशी जागृत झाली ? आजकाल तर लोक देशभक्ती कमी आणि देखावा जास्त करतात ? यावर कंगनाने कडक उत्तर दिले आणि म्हणाली, 'जर तुम्ही कुणावर प्रेम करता तर ते व्यक्त करणेही गरजेचे असते ना. ना सांगता समोरच्याला कसे कळेल की तुमच्यामध्ये काय आहे. याचप्रमाणे जर तुमच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना आहे तर त्याला कुठे ना कुठे तुम्हाला शो करावे लागेल. 

 

देशप्रेमाला आपली सुविधा बनवू नका...
गीतकार प्रसून जोशीनेही देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमावर परंतू उठवणाऱ्यांना कणखर उत्तर दिले. जोशी म्हणाले, 'जर तुमच्यमध्ये एखादी भावना हे तर ती व्यक्त तर करावीच लागेल, भले मग तुम्ही तिला आपल्या पद्धतीने व्यक्त कराल, ते इमोशन तुमच्या डोळ्यात दिसते, तुमच्या हावभावात दिसते. जर तुम्हाला असे वबटाटे की ते दिसूही नये आणि जेव्हा मला विचारले जावे तेव्हा मी म्हणावे की, मित्र सर्वात मोठा देशभक्त आहे. पहा, देशप्रेमाला सुविधा बनवू नका'. फिल्मच्या म्युझिक लॉन्चसाठी कंगना आणि प्रसून जोशी यांच्याव्यतिरिक्त म्युझिक इंडस्ट्रीची पॉप्युलर तिकड़ी, शंकर-एहसान-लॉय हेदेखील उपस्थित होते. 

 

अंकिता लोखंडे फिल्मने करत आहे डेब्यू...
या फिल्मद्वारे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणजेच अंकिता लोखंडेही बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. ती झलकारी बाईच्या भूमिकेत आहे. या फिल्मचे डायरेक्शन राधाकृष्ण जगरलमुडी म्हणजेच कृष करत आहेत. फिल्ममध्ये लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत कंगना खूप सुनंदार दिसत आहे. कंगनाचा लुक आणि तिचे अक्शन सीन ट्रेलरमध्ये खूप सुंदरतेने दाखवले आहेत. ट्रेलर 18 डिसेंबरला रिलीज झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...