आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिकर्णिका / महेश्वरमधील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर कंगनाने उज्जैनच्या महाकालेश्वराचे घेतले दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे महेश्वर येथील शूटिंग शेड्युल पूर्ण झाले आहे. शूटिंगसाठी कंगना चित्रपटाच्या संपूर्ण कास्ट आणि क्रू मेंबर्ससोबत महेश्वर येथे पोहोचली होती. येथे त्यांनी एका गाण्याचे चित्रीकरण केले. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर कंगनाने संपूर्ण युनिटसोबत फोटो काढले. त्यानंतर कंगनाने उज्जैनला जाऊन महाकालेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी चित्रपटाचे निर्माते कमल जैन तिच्यासोबत होते. 


2 ऑक्टोबर रोजी आला होता टीजर :
'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचा पहिला टीजर याच महिन्यात गांधी जयंतीच्या दिवशी रिलीज झाला होता. हा चित्रपट पुढील वर्षी 25 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत आहे. कंगनाने अभिनयासोबतच काही भाग दिग्दर्शित केला आहे, पण चित्रपटाचा दिग्दर्शक कृष असेल. चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबर 2017 मध्ये सुरु झाले होते. शूटिंगला 120 दिवस लागले. 

बातम्या आणखी आहेत...