कंगनाच्या बहिणीने आलिया भट्टला पुन्हा सुनावले, म्हणाली - 'लोक मूर्ख नाहीत, त्यांना माहित आहे कोण एकटे आहे आणि कुणासोबत फिल्म माफिया समूह आहे'

जेव्हा कंगनाने उडवली होती मुलीची खिल्ली तेव्हा भडकली होती आलियाची आई, दिले होते सडेतोड उत्तर... 

दिव्य मराठी

Apr 24,2019 11:14:00 AM IST

मुंबई : कंगना रनोट आणि आलिया भट्ट यांचे वादविवाद संपण्याचे नावाचं घेत नाहीये. आता यामध्ये कंगनाची बहिणी रंगोलीदेखील बोलू लागली आहे. एकानंतर एक अनेक ट्वीट्समध्ये रंगोलीने पुन्हा एकदा आलिया भट्टला खूप काही ऐकवले. रंगोलीने यावेळी आलियाच्या अशातच केलेल्या वक्तव्यावर निशाना साधला आहे, ज्यामध्ये ती म्हणाली होती की, दुसऱ्यांनी (कंगना) कितीही काहीही म्हणाले तरी ती गप्प बसेल.

रंगोलीने आलियाला से दिले उत्तर...
ट्विटरवर रंगोलीने लिहिले, "लोक मूर्ख नाहीत, त्यांना माहित आहे कोण एकटे आहे आणि कुणासोबत फिल्म माफिया समूह आहे. यावेळी प्रामाणिकपणा आणि पारदर्शितपणाला सर्वात जास्त महत्व दिले जात आहे, यासाठी "मी गप्प बसेल.' की, इमोशनल कहाणी आपल्यापर्यंतच ठेवा. याला प्रत्येक दिवशी व्हायरल करायची काही एक गरज नाही.'' एवढेच नाही, रंगोलीने आलियावर दुसर्यांचा जॉब्स हिरावल्याचा आरोपदेखील केला. रंगोलीने लिहिले, "प्रत्येक दिवशी काम आणि संधी हिसकावणे, भीक मागणे आणि प्रोड्यूसर्सला कास्ट करण्यासाठी प्रार्थना करणे, गेम खेळणे, फिल्म बळकावण्यासाठी कनेक्शनचा उपयोग करणे. लोक एवढेही मूर्ख नाहीत, जे सर्व पाहत आहेत.' कंगना आणि रंगोलीने ट्विटरवर आलिया भट्ट आणि तिची आई सोनी राजदानलाही खूप काही ऐकवले.

असे आहे पूर्ण प्रकरण...
- काही दिवसांपूर्वी कंगनाने आलियाची फिल्म 'गली बॉय' बद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगना म्हणाली होती की, फिल्ममध्ये आलियाने काही खास काम केलेले नाही. त्यांनतर आलियाने कंगनाला उत्तर देताना म्हणाली होती की, ती यापुढे काळजी घेईल आणि मेहनत करेल जेणेकरून बॉलिवूड क्वीनला तिच्याबद्दल काहीही तक्रार नसेल.

- कंगनाच्या बोलण्याने नाराज होऊन आलियाची आई सोनी राजदानने एक ट्वीट करून लिहिले, 'महेश भट्ट ते व्यक्ती आहेत, ज्यांनी कंगनाला ब्रेक दिला आणि ती सतत त्यांचीच पत्नी आणि मुलीवर हल्ला करत आहे. आता मी काय संगी की, यामागे तिचा काय अजेंडा आहे ?'

रंगोलीने दिले होते आलियाच्या आईला उत्तर...
सोनीच्या ट्वीटनंतर रंगोली या वादामध्ये पडली आहे. तिने सोनीला उत्तर देत एक मोठा खुलासा केला आहे. तिने लिहिले, 'फिल्म 'वो लम्हें' च्या प्रिव्यूदरम्यान महेशने 19 वर्षांच्या कंगनावर चप्पल फेकली होती. तिने कंगनाला फिल्म नाही पाहू दिली. त्यांनतर माझी बहीण रात्रभर रडली होती.' रंगोलीने ट्वीट करून लिहिले, 'प्रिय सोनीजी महेश भट्टने तिला ब्रेक नाही दिला तर अनुराग बासुने दिला आहे. महेशजीने त्या फिल्ममध्ये क्रिएटिव डायरेक्ट म्हणून काम केले होते.'

X