आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranaut Sister Rangoli Chandel, On Deepika Padukone Padmaavat Movie, Ajay Devgn Appeals To Support Taanaji

आधी केले दीपिकाच्या 'छपाक' चित्रपटाचे कौतुक, नंतर तिच्याच 'पद्मावत'ला म्हटले सॉफ्ट पोर्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाेवीस तासांत बदलला रंगाेलीचा सूर... तिच्यावरही झाला होता अॅसिड अटॅक
  • 'छपाक'सोबत रिलीज झालेल्या अजयच्या 'तान्हाजी'ला पाहण्याची केली विनंती

एंटरटेन्मेंट डेस्कः कंगना रनोटची बहिण रंगोली चंदेल आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहते. शुक्रवारी पुन्हा एकदा ती नवीन वादामुळे चर्चेत आली. तिने एक ट्वीट करत दीपिका पादुकोण स्टारर आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' चित्रपटाला सॉफ्ट पोर्न म्हटले. याबरोबरच अजय देवगणनच्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटाला सपोर्ट करण्याची अपीलदेखील केली. रंगोलीने या ट्वीटमध्ये संजय दत्तच्या आयुष्यावर बनलेल्या 'संजू'लाही ओढले आहे.

हे होते रंगोलीचे ट्विट : 'सिने इंडस्ट्रीने नवे पाऊल उचलले आहे. आपण 'तान्हाजी'लाही तितकेच प्रेम देऊ का जितके आपण जितना क्रिमिनल व्हाइट वॉशिंग करणाऱ्या 'संजू' किंवा सॉफ्ट पोर्नच्या 'पद्मावत'ला दिले? टाळी दोन्ही हातांनी वाजते. हाथ बढ़ाओ देश बचाओ.'

कौतुक करत शेअर केला कंगनाचा व्हिडिओ : विशेष म्हणजे रंगाेलीने नुकतेच दीपिकाच्या 'छपाक'चा व्हिडिओ शेअर करत त्याचे कौतुक केले होते. तिने जो व्हिडिओ शेअर केला होता, त्यात तिची बहिण कंगना 'छपाक'विषयी बोलताना दिसत आहे. स्वत: रंगोलीनेदेखील अॅसिड अटॅक सारख्या विषयावर बनलेल्या चित्रपटाचे कौतुक केले हाेते. कारण तिच्यावरदेखील अॅसिड हल्ला झाल्याचे तिने सांगितले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी तिने दीपिकाच्या 'पद्मावत' चित्रपटाला सॉफ्ट पोर्न म्हटले. एवढेच नव्हे तर तिने प्रेक्षकांना 'तान्हाजी' पाहण्याची विनंतीदेखील केली आहे. त्याची टक्कर 'छपाक' सोबत झाली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...