आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'थलाइवी'साठी झाले 70 किलो वजन, आता 2 महिन्यांत 20 किलो वजन करणार कमी कंगना रनोट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या ट्रेनर योगेशसोबत वर्क आउट करताना कंगना - Divya Marathi
आपल्या ट्रेनर योगेशसोबत वर्क आउट करताना कंगना
  • ‘थलाइवी’ साठी वाढवले होते वजन
  • दोन महिन्यांनंतर सुरू होणार 'तेजस' चित्रपटांचे चित्रीकरण

बॉलिवूड डेस्कः  कंगना रनोट काही दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट ‘थलाइवी’च्या चित्रीकरणात व्यग्र होती. हा चित्रपट जयललिता यांचा बायोपिक आहे, ज्यात कंगनाला 70 किलोपर्यंत वजन वाढवावे लागले. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे आणि आता कंगना तिचा पुढचा चित्रपट ‘धाकड’ आणि ‘तेजस’च्या तयारीसाठी वजन कमी करत आहे. ती ‘धाकड’मध्ये बरेच अ‍ॅक्शन दृश्य करणार आहे. तर, ‘तेजस’मध्ये इंडियन एअरफोर्स अधिकाऱ्याची भूमिका करणार आहे. या दोन्ही चित्रपटांसाठी तिला वजन कमी करावे लागणार आहे.

गुरुवारी सोशल मीडियावर कंगनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, तिच्या टीमने तो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना वजन कमी करण्याची तयारी करताना दिसतेय.ती तिचा ट्रेनर योगेशसोबत आपल्या वजनबाबत चर्चा करताना सांगतेय, काही दिवसांपूर्वीच तिचे वजन 52 किलो होते आणि आता ती 70 किलोची झाली आहे. तर, यावर योगेश म्हणतो, त्याला कंगनावर विश्वास आहे, जी दररोज मेहनत करून दाेनच महिन्यांत आपले वजन कमी करून फिट होईल. कंगनाच्या ‘तेजस’ या चित्रपटाचे चित्रीकरण दोन महिन्यांत सुरू होईल. 20 किलो वजन कमी करण्यासाठी फक्त दोनच महिने शिल्लक राहिलेत. ‘धाकड’ हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन जाहिरात निर्माते रजनीश घई करत असून याचे निर्माते सोहेल मकलई आहेत. हा चित्रपट 2020 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होईल.