आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranaut Turns Producer With Aparajitha Ayodhya The Film On Ram Mandir Babri Masjid Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्माती बनलेल्या कंगनाचा मोठा निर्णय, राम मंदिरावर 'अपराजित अयोध्या' नावाने काढणार चित्रपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रॉडक्शन हाऊस निर्मितीसाठी करणार वेगळ्या धाटणीच्या विषयांची निवड
  • 'बाहुबली' फेम विजेंद्र प्रसाद लिहिणार स्क्रिप्ट...

बॉलिवूड डेस्कः  'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटासाठी दिग्दर्शिका म्हणून काम करणारी अभिनेत्री कंगना रनोट आता निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. अयोध्या येथील विवादित राम मंदिराच्या प्रकरणावर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात घडलेल्या संपूर्ण घटनाक्रमावर कंगना रनोट चित्रपट तयार करत असून 'अपराजित अयोध्या' हे चित्रपटाचे नाव आहे. यासाठी तिने इंडस्ट्रीतील आघाडीच्या स्टुडिओजसोबत बातचित सुरु केली आहे.  

'बाहुबली' फेम विजेंद्र प्रसाद लिहिणार स्क्रिप्ट... 
रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध लेखक के. व्ही. विजेंद्र प्रसाद या चित्रपटाच्या पटकथेवर काम करत आहेत. याआधी त्यांनी ‘बाहुबली’ या चित्रपटाची पटकथा तयार केली होती. या चित्रपटात एका नास्तिक तरुणाचा आस्तिकतेपर्यंतचा प्रवास दाखवला जाणार आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल.  

या विषयावर का चित्रपट बनवतेय कंगना... 
एका मुलाखतीत कंगनाने हाच विषय का निवडला याविषयी सांगितले. ती म्हणाली, "अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या प्रदीर्घ काळ चिघळलेल्या मुद्दय़ावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकालाद्वारे सामंजस्यपूर्ण तोडगा काढला आहे. या निकालामुळे अखेर हा मुद्दा समाप्त झाला. लहानपणापासून मी या प्रकरणाबाबत ऐकत आले आहे. म्हणूनच मी या कथानकावर चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला.” 


प्रॉडक्शन हाऊस  निर्मितीसाठी करणार वेगळ्या धाटणीच्या विषयांची न
िवड  
एका आठवड्यापूर्वी कंगना रनोटची बहीण आणि तिची मॅनेजर रंगोली चंदेलने त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली होती. तिने ट्वीट करुन सांगितले होते, की त्यांनी त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव मणिकर्णिका फिल्म्स असे ठेवले आहे. हे नाव झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या नावावर आहे. या बॅनरअंतर्गत अशाच चित्रपटांची निर्मिती केली जाईल, ज्या विषयांवर भाष्य करायला लोक घाबरतात. 

बातम्या आणखी आहेत...