आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : 'सांड की आंख' चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांनी साकारलेल्या वृद्ध शूटर आजींच्या भूमिकांवर खूप प्रश्न उभे केले जात आहेत. या वादाची सुरुवात कंगना रनोटची बहीण रंगोलीने केली होती. त्यानंतर नीना गुप्ता यांनीदेखील तिच्या सुरत सूर मिसळला. रंगोलीच्या स्टेटमेंटने अस्वस्थ झालेल्या मेकर्सने अखेर मौन सोडले आणि आणि काही खुलासे केले आहेत. नाव ना छापण्याच्या अटीवर त्यांनी भास्करला रंगोलीने केलेल्या या प्रश्नांचे कारण सांगितले आहे.
कंगनाला आपल्या अटीवर करायचा होता चित्रपट...
मेकर्सचे म्हणणे आहे की, वास्तविक आधी शूटर आजीचा रोल कंगनालाच ऑफर झाला होता आणि ती तो करण्यासाठी तयारही झाली होती. मात्र तिच्या खूप अटी होत्या. आधी तर कंगना हा दबाव टाकत होती की, दोन्ही आजींचा रोल एकच केला जावा, जेणेकरून दुसऱ्या हीरोइनचा प्रश्नच राहणार नाही आणि चित्रपटात सर्वत्र केवळ तीच दिसेल. मग तिचे म्हणणे होते की, जर एका अभिनेत्रीवर चित्रपट होणार नसेल तर चित्रपटात तिचा डबल रोल दाखवला जावा. जेणेकरून शूटर आजी चंद्रो आणि प्रकाशी तोमर दोघींच्याही भूमिका ती करू शकेल. तिच्या या अटी मान्य न झाल्यामुळे तिने चित्रपट सोडला.
रंगोली काय म्हणाली होती...
रंगोली म्हणाली, 'हा रोल कंगनाला ऑफर झाला होता. तिला आवडली होती. पण तिचे म्हणणे होते की, चित्रपट एखाद्या 50 वर्षांच्या पुढच्या हीरोइनने केलेलाच योग्य राहील. त्यामुळे हा चित्रपट तिने केला नाही.'
अशाप्रकारचा रोल करण्याची आहे कंगनाची इच्छा...
सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे अशाप्रकारचे रोल करून कंगना आपला अभिनय अधिक उत्तम बनवू इच्छिते. ती यापूर्वी 80 वर्षांच्या वयस्कर महिलेच्या संघर्षावर बनलेला चित्रपट 'तेजू' बनवू इच्छित होती. पण तो डिले झाला. दोन वर्षानंतरदेखील हा चित्रपट फ्लोअरवर येऊ शकला नाही. परिणामी कंगना 'सांड की आंख' करू इच्छित होती. पण तेही होऊ शकले नाही.
अशाप्रकारे मिळाला भूमी-तापसीला हा चित्रपट...
मेकर्सला कंगनाचे डबल रोलबद्दलचे मत काहीसे आवडलेही होते. कारण 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' मध्ये तिच्या दुहेरी भूमिकेला खूप पसंती मिळावी होती. पण नंतर मेकर्सला वाटले की, दोन्ही आजी खूप प्रसिद्ध आहेत. दोघींचीही आपली एक ओळख आहे. अशात डबल रोल होऊच शकत नाही. म्हणून मेकर्स आणि कंगना यांचे एकमत झाले नाही. फायनली आजींच्या भूमिका तापसी आणि भूमीला मिळाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.