आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranot Debts With Journalist For Six And Half Minutes In Promotion Event, After That Had Ekta Kapoor Apologies

प्रमोशन इव्हेंटमध्ये पत्रकारासोबत कंगनाने साडे सहा मिनिटे घातला वाद, एकता कपूरने हात जोडून मागितली माफी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोट आणि राजकुमार राव स्टारर 'जजमेंटल है क्या' चे पहिले गाणे 'द वखरा' रविवारी संध्याकाळी रिलीज केले गेले. यादरम्यान तेव्हा वादग्रस्त परिस्थिती बनली होती, जेव्हा कंगना मीडियासोबत बातचीत करत होती. प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये जस्टिन राव नावाच्या एका पत्रकाराने जसे आपले नाव सांगितले, कंगना रनोट त्याच्यावर भडकली. सुमारे साडे सहा मिनिटे ती त्या पत्रकारासोबत भांडत होती. कंगना म्हणाली, "जस्टिन तू तर आमचा शत्रू बनला आहे यार. खूप वाईट गोष्टी लिहीत आहेस. किती जास्त घाणेरड्या गोष्टी लिहीत आहेस. इतका घाणेरडा विचार कसा करतो." 

 

जेव्हा पत्रकाराने तिला मध्येच टोकले आणि म्हणाला की, त्याच्यावर असे आरोप करणे उचित नाही तर कंगना म्हणाली, "पण मग तुझ्यासाठी असे करणे उचित आहे का ?" कंगना पुढे म्हणाली, "तू म्हणालास कि मी जिंगोस्टिक महिला आहे, जिने मणिकर्णिका बनवला आहे. राष्ट्रवादावर चित्रपट बनवून मी काही चूक केली का ?"

 

पत्रकार म्हणाला - मी कोणतेही ट्वीट नाही केले... 
पत्रकार म्हणाला, "मी मणिकर्णिकाबद्दल कोणतेही ट्वीट नाही केले." यावर कंगना म्हणाली, 'मी पाठवते तुला ते." पत्रकार म्हणाला, "ही योग्य पद्धत नाहीये कंगना. तू केवळ यासाठी पत्रकाराला नाही घाबरवू शकत, कारण तुझ्याकडे पॉवर आहे." यावर कंगनाने स्पष्टीकरण दिले, "मी कुणालाही घाबरवत नाहीये, जसे इथे सर्वजण एकमेकांशी बोलत आहेत तशीच मीही बोलत आहे."

 

कंगनाचा तर्क - 'तू माझ्या व्हॅनमध्ये आला होता...'
कंगना पुढे म्हणाली, "जस्टिन तू माझ्या व्हॅनमध्ये आला होता, आपण सोबत लंच केले होते. आमचा इंटरव्यू झाला होता, तू तीन तास माझ्या व्हॅनमध्ये घालवले. तू मित्र आहेस. याच संदर्भाने मी म्हणते आहे की, तू जसा व्हॅनमधून बाहेर गेलास सर्व गोष्टी एकदम बदलल्या. मी तुला पर्सनली ओळखते. त्यामुळे हे नको म्हणू की, मी तुला घाबरवत आहे. तू मला पर्सनली मॅसेज पाठवले, तू माझ्या व्हॅनमध्ये आलास, तर हे म्हणण्याचा प्रयत्न करू नकोस की, मी स्टारप्रमाणे वर्तन करत आहे. मी तुझ्याशी मित्राप्रमाणे बोलत आहे."

 

पत्रकाराचा दावा - 'मी कोणतेही मॅसेज नाही केले...' 
पत्रकाराने स्पष्टीकरण देत सांगितले, "मी कधीच तुझ्या व्हॅनमध्ये तीन तास नाही राहिलो, मी तुझा इंटरव्यू घेतला होता, जो पीआर पराग देसाईद्वारे झाला होता, मी अर्ध्या तासाचा इंटरव्यू घेतला होता. आपण सोबत लंच नाही केले. मी कधी तुला मॅसेजेस नाही पाठवले. मी माझा जॉब केला."

 

वाद वाढल्यानंतर कंगनाने जस्टिनला स्पष्टपणे सांगितले की, त्याच्यासोबत बोलायचे नाही. तिच्यानुसार, जस्टिनने तिची प्रतिमा खराब केली. कंगना म्हणाली, "मला तुझ्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही, तू मला बदनाम करण्यासाठी अभियान चालवले."

 

एकता कपूरला मागावी लागली माफी... 
कंगना आणि जस्टिनचा वाद वाढताना पाहून प्रोड्यूसर एकता कपूरला समोर यावे लागले. तिने हात जोडून मीडियाची माफी मागितली. तेव्हा कुठे जाऊन प्रकरण निवळले आणि इतर रिपोर्टर्ससोबत कंगना आणि चित्रपटाच्या टीमने प्रेस कॉन्फरन्स पूर्ण केली.  

 

येथून सुरु झाला होता वाद... 
हा वाद मार्चमध्ये पत्रकाराने केलेल्या त्या ट्वीटशी निगडित आहे, ज्यामध्ये त्याने कंगनाचा चित्रपट 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' च्या पाकिस्तानमधील रिलीजबद्दल प्रश्न केला होता. 

 

पत्रकाराने लिहिले होते, "उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एका इव्हेंटमध्ये गेल्यामुळे कंगना, शबाना आजमी आणि इतर सेलेब्सभडकली होती. मी तिला विचारले होते की, मग त्याच उरीच्या हल्ल्यानंतर तिने तिचा चित्रपट 'मणिकर्णिका' पाकिस्तानमध्ये रिलीज का केला ? यावर तिची प्रतिक्रिया पाहा."

 

 

पत्रकाराने यासोबतच कंगनाचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती म्हणत होती की, डिस्ट्रीब्यूशनच्या वेळी चित्रपटाची एक डिजिटल कॉपी तिथे चालल्या गेली होती, जेथून ती परत आणणे शक्य नव्हते.

बातम्या आणखी आहेत...