आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranot Said 'I Agree That My Method Of Expression Was Not Correct, But This Time It Was Too Much'

कंगना म्हणाली - 'व्यक्त होण्याची माझी पद्धत योग्य नव्हती, हे मान्य करते, मात्र या वेळी अति झाले होते' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'जजमेंटल है क्या'च्या प्रमोशन कार्यक्रमात एका पत्रकारांसोबत वाद झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रनोट पुन्हा एकदा लोक आणि मीडियाच्या डोळ्यावर आली आहे. आधी काही माध्यमांनी कंगनावर बॅन लावला, नंतर देशाची सर्वात मोठी न्यूज एजन्सी पीटीआयनेदेखील तिच्यावर बहिष्कार टाकला. यावरून कंगना रनोटने पत्रकार संघटना आणि प्रेस क्लब ऑफ इंडियाला कायदेशीर नोटीस पाठवली. त्यामुळे कंगना रनोटचा स्वभाव चांगला नाही, असे लोकांना वाटू लागले आहे. या विषयावर सविस्तर बोलण्यासाठी, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यााठी दैनिक भास्करच्या प्रश्नांच्या काेर्टात हजर झाली.

त्या मुलाखतीचा भाग... 

 

पण, आदर्श जग 'विसरा आणि माफ करा' या सिद्धांतावर टिकून आहे. यावर किती विश्वास आहे? कंगना बदला घेऊनच दम घेतेय का? 
माझा या तत्त्वज्ञानावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आपल्या शत्रूंकडे सातत्याने दुर्लक्ष करत राहाल तर भविष्यातही तुम्ही त्यांच्या आक्रमणाचा शिकार होत राहाल. परिणामी आम्हाला तुमचा अजेंडा माहीत आहे, हे त्यांना पटवून देणे आवश्यक असते. तथापि, त्यांना ठरवून नुकसान पोहोचवण्याचा हेतू नसावा. मनामध्ये जे आहे ते व्यक्त केले पाहिजे, परंतु दीर्घ काळ मनामध्ये कटुता ठेवू नये. इतरांचे वाईट व्हावे, असे मला मुळीच वाटत नाही. 

 

पत्रकार वर्गासोबत तुझा जो वाद झाला होता, आता तुला त्याविषयी काय वाटतं? 
एकट्या जिवासाठी संघर्ष करणे अवघड असते. खरं तर, मीडियातील काही लोक मोठ्या स्टार्सच्या म्हणण्यानुसार वागतात. माझ्यावर आरोप लावत असतात. वैयक्तिक मतभेद मी कधीच आपल्या कामाच्या मध्ये आणत नाही. खूप संघर्षानंतर मला यश मिळाले आहे. आपल्या मेहनतीवर शंका घेतल्याचे पाहून माझे धैर्य खचले. ज्या पत्रकारासोबत माझे भांडण झाले तो 'मणिकर्णिका'च्या सक्सेस पार्टीत माझ्या घरी आला होता. लोकांसोबत वैयक्तिक नाते जपण्यात मी विश्वास ठेवते. लोकांसारखं मॅनेजर किंवा सेक्रेटरीच्या माध्यमातून मी काही भांडण करत नाही. त्या पत्रकारांसोबत मला काही जास्त बोलायचं नव्हतं. मात्र तेच ओरडून बोलू लागले. माझ्यावर आरोप करू लागले. तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मीडियाला भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाणी जेव्हा डोक्याच्या वर गेले तेव्हा मला त्या कार्यक्रमात आपली बाजू मांडण्यासाठी हा मार्ग सापडला. ती पद्धत योग्य नव्हती हे मला माहीत आहे, मात्र माझ्याकडे पर्याय नव्हता आणि दुसरं काहीच त्या वेळी सुचलं नाही. 

 

पण, तुमचा चित्रपट किंवा तुमच्या मताशी कुणी सहमत नसेल तर त्याला देशद्रोही म्हणणे कितपत योग्य आहे? 
त्या व्हिडिओमध्ये मी सर्वांनाच देशद्रोही म्हटलेले नाही. ते एका विशिष्ट व्यक्तीबाबत होते आणि तो पत्रकार होता. कारण त्याने लग्नाची थट्टा केली होती, पर्यावरणदिनाची थट्टा केली होती. मी माझी दु:खद कहाणी सांगत नव्हते, तर वस्तुत: मला एक संदेश देशातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. तरीदेखील त्या संदेशाची थट्टा त्या व्यक्तीने उडवली होती. त्या व्यक्तीने वैयक्तिकरीत्या माझी थट्टा केली नव्हती, तर त्या महत्त्वाच्या संदेशाची थट्टा उडवली होती. त्यानंतर मी व्हिडियो जारी केला आणि देशातील समस्यांविरोधात बोलणाऱ्यास देशद्रोही म्हणाले. एक पत्रकार म्हणूनही तुम्ही उत्तरदायी आहात. जर कुणी माझा चित्रपट 'जजमेंटल है क्या'ची थट्टा करत असेल तर तो देशद्रोही नाही, परंतु कुणी 'मणिकर्णिका'तील महान पात्रांची थट्टा करत असेल तर तो नक्कीच देशद्रोही आहे. 

 

आता या वादानंतर दोन्ही बाजूंकडून माफी किंवा तडजोड व्हावी असं तुला वाटतं का? 
कुणालाही कोणाची माफी मागायची गरज नाही, असे मला वाटते. त्यांनाही गरज नाही आणि मलाही गरज नाही. मी त्यांना काहीच वाईट किंवा अश्लील बोलले नाही. मी तुमची शत्रू आहे का? एवढंच मी त्यांना म्हटलं हाेते. मी माझी मर्यादा ओलांडली नाही. मात्र काही हरकत नाही. ते लोक जर पुढे आले तर मीदेखील पुढे यायला तयार आहे. मला फक्त एवढचं सांगायचं की, कोणत्याही गोष्टीत आदर असला तर ती इतकी वाढत नाही. 

 

सार्वजनिक ठिकाणी तुला हे प्रकरण वाढवायला नकाे होते, असा विचार पुढे येत आहे ? 
खरं तर, हे प्रकरण वाढणारचं हाेतं. कारण काही लाेक माझा नेहमी विरोध करत असतात. यासाठी ते एक मोहीमदेखील चालवतात. हे सर्व ते चित्रपट माफियाच्या सांगण्यावरून करतात. त्यामुळे अशा लोकांना मी तंबी देऊ इच्छित होते. मी आता घाबरणार नाही, असे मी त्यांना सांगत होते. याआधीही अनेक पत्रकारांसोबत अनेक स्टार्सनी गैरवर्तन केले अाहे. मी कुणाचे नाव घेणार नाही, मात्र मला सर्व माहीत आहे, बऱ्याच लोकांनी शिव्या दिल्या होत्या, तर कुणी हाणामारीदेखील केली आहे. तेव्हा प्रकरण इतके मोठे केले नव्हते. काही लोक मला म्हणतात...,'कमिंग फ्रॉम नो व्हेअर'. माझे आई-वडील आहेत. खरं तर, त्या लोकांना मी कंटाळले होते, त्यांना एकदा समजावणे फार गरजेचे होते. 

 

ज्या रॅकेटबाबत तुम्ही बोलत आहात, तो तुमच्या मनातील भ्रमदेखील असू शकतो? 
भ्रम तेव्हा असेल, जेव्हा माझ्या विरोधात एखादवेळी लिहिले गेले असते. वैयक्तिकरित्या मिळून मतभेद दूर करण्याचे प्रयत्नही झाले असते. इतर अभिनेत्यांबाबत बोलायचे झाल्यास एखाद्या अभिनेत्याने मीडियोकर परफॉर्मन्सही केला असता तरी तो काही निवडक पत्रकारांना योग्य वाटला असता. मात्र, मी अरे जरी म्हटले तरी तो खूप मोठा गुन्हा ठरतो. 

 

कंगना रागीट आहे, तिच्यासोबत काम करणे अवघड आहे, असं पसरत चाललं आहे, यात किती सत्य आहे ?

मी खरंच रागीट किंवा तापट आहे, हे मी म्हणणार नाही. मात्र वेगळं काही तरी करण्यासाठी मी १५ वर्षांची असतानाच घरातून पळून येथे आले होते. जे लोक मला कळतात, मी त्यांच्या पायावर लोळते. जे कळत नाहीत त्यांच्यासोबत हात मिळवणीही करत नाही. इतकी जिद्दी मी आहे आणि लहानपणापासून आहे. मात्र, माझी आवड किंवा नावड कामात मी कधीच समोर आणत नाही. हीच माझ्या कामाची पद्धत आहे. तेव्हाच मी येथे टिकले आहे. मी इंडस्ट्रीतील कोणत्याच गटात नाही. स्वत:मध्ये मस्त राहते.