आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : कंगना रनोट पुन्हा एकदा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यावर भडकली. अशातच तिने एक इंटरव्यू दिला होता. यादरम्यान तिने रणबीर आणि आलिया यांच्याबद्दल एक विधान केले. दोघांबद्दल ती म्हणाली, "यांना देशातील मुद्यांबद्दल काहीही देणे घेणे नाही. हे गरजेच्या मुद्यांवर कधीही बोलत नाहीत. यांना सेक्स लाइफबद्दल विचारले तर ते यावर चर्चा करण्यासाठी नेहमी तयार असतात."
कंगनाने रणबीर-आलियाच्या स्वतःला यंग म्हणण्यावर घेतला आक्षेप...
कंगना, रणबीर-आलियाच्या स्वतःला यंग म्हणण्यावर आक्षेप घेत म्हणाली, "रणबीर 37 आणि आलिया 27 वर्षांची आहे तर ते यंग कसे झाले ? 27 वय वर्षात तर माझ्या आईची तीन मुले झाली होती." यासोबतच ती दोघांना म्हणाली, "मुले आहेत, की डंब आहेत की काय आहेत ? इंस्टावर फोटो शेयर करतात. मी याच्यासोबत, त्याच्यासोबत नाही. हे सर्व तर चला ठीक आहे पण जेव्हा देशाचा प्रश्न येतो आणि यांना काही विचारावे तर म्हणतील, इट्स माय पर्सनल चॉईस."
यापूर्वीही आलियावर केली होती टीका...
कंगना रनोट यापूर्वीही आलियाबद्दल असेच काहीतरी बोलली होती आणि तिने आलियाला कारण जोहरच्या 'हातातली बाहुली' असे संबोधले होते. 'मणिकर्णिका' च्यावेळीही कंगना आलियाला म्हणाली होती, "आलियाने मला 'राजी' चा ट्रेलर पाठवला होता आणि फिल्म पाहण्याबद्दल म्हणाली होती. पण जेव्हा माझ्या फिल्मची वेळ आली तेव्हा तिच्याकडून काहीही रिस्पॉन्स आला नाही. आलिया एक महिला असल्याकारणाने दुसऱ्या महिलेवर बनलेली फिल्मला सपोर्ट करायला पाहिजे होता."
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.