आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅसिड अटॅक नंतर 57 वेळा करावी लागली कंगनाच्या बहिणीची सर्जरी, इतकी घाबरलेली होती की, तीन महिन्यांपर्यंत आरश्यातदेखील पाहत नव्हती रंगोली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अॅसिड अटॅक सर्व्हायवर लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित फिल्म 'छपाक' चा फर्स्ट लुक अशातच रिलीज झाला. फिल्ममध्ये दीपिका पदुकोण अॅसिड अटॅक सर्व्हायव्हरचा रोल प्ले करत आहे. तसे तर रियल लाइफमध्ये अनेक लोक आहेत ज्यांच्यावर अॅसिड अटॅक झाला आहे आणि त्यातीलच एक आहे कंगना रनोटची बहीण रंगोली. 2006 मध्ये कंगनाची मोठी बहीण रंगोलीवर अॅसिड अटॅक झाला होता. या घटनेनंतर रंगोलीची एक नव्हे तर तब्बल 57 सर्जरी कराव्या लागल्या होत्या. 

3 महिन्यांपर्यंत पहिले नव्हते आरश्यात...
एका इंटरव्यूमध्ये रंगोलीने सांगितले होते, "अॅसिड अटॅक झालेल्या व्यक्तीला जर वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर त्याची स्किन इफेक्ट होऊन शरीराच्या इतर भागांनाही त्यामुळे नुकसान पोहोचते. यामुळे वेळेवर मेडिकल ट्रीटमेंट देऊन इन्फेक्शनला थांबवले जाऊ शकते. नाहीतर ते अॅसिड पीडितेच्या ऑर्गनला नुकसान पोचवू शकते. रंगोलीनुसार, ''माझ्या डोळ्याच्या 90% टक्के प्रकाश गेला होता, माझे एक ब्रेस्टदेखील खराब झाले आहे आणि हे सर्व तेव्हा झाले जेव्हा मला देशात उपलब्ध असलेले सर्वात चांगले उपचार मिळाले. अॅसिड अटॅक कोणताही रेग्युलर अॅक्सिडेंट नाही. जेव्हा माझ्यासोबत ही घटना घडली तेव्हा मला श्वास घ्यायलाबी खूप प्रॉब्लम येत होता, कारण श्वास नलिका संकुचित झाली होती. मी तेव्हा केवळ चेहऱ्यावरच्या डागांबद्दलच विचार करत होते. मी त्यानंतर तीन महिने आरश्यासमोर गेले नव्हते. ऍन नलिका आणि श्वास नलिका डॅमेज झाल्याकारणाने मी जीविताची संघर्ष करत होते. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते आणि तेव्हा मी अनेक ऑपरेशनचा सामना केला. प्रत्येक दिवशी मला वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जात आहे."

23 वर्षांच्या वयात झाल्या होत्या 57 सर्जरी...
रंगोली म्हणाली, "प्लास्टिक सर्जरी एवढी सोपी नसते. ती तुम्हाला नवीन चेहरा देत नाही. माझ्या पायांवरून स्किन काढून दुसऱ्या ठिकाणी लावली गेली. 57 सर्जरी झाल्या. शारीरिक वेदनेसोबत 23 च्या वयात मानसिक ताण खूप भयानक होता. त्यावेळी कंगना स्ट्रगल करत होती. ती मला मुंबईला घेऊन आली. आई वडिल माझा त्रास पाहू शकत नव्हते."

गल्लीतील गुंड्याने फेकले होते अॅसिड...  
कंगनाने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, "लोकांना वाटते की, गप्प बसलो तर प्रकरणच संपून जाते पण जर तुम्हाला कुणी परेशान करत असेल तर गप्प बसल्याने ते संपत नाही. ती व्यक्ती तुम्हाला त्यापुढेही परेशान करतच राहील. जर प्रकरण संपवायचे असेल तर तुम्हाला त्याच्याशी भिडावेच लागेल. ज्या मुलाने माझी बहीण रंगोलीवर अॅसिड अटॅक केला होता तो नेहमी तिला काहींना काही म्हणत होता आणि माझी बहीण ते इग्नोर करत होती. जर तिने त्याला इग्नोर केले नसते, तर कदाचित सर्वकाही वेगळे असते. कारण तो गल्लीतील एक छोटासा गुंडा होता. आज तो स्वतः पश्चात्ताप करत असेल की, त्याने असे का केले ? कारण दोघे लहान होते आणि शाळेत जायचे. जर त्यावेळी दोघांनाही सांभाळता आले असते तर ही घटना टळली असती."

आदित्य पंचोलीने केली होती रंगोलीची मदत...
आदित्य पंचोली यांच्यानुसार, ''जेव्हा कंगनाची बहीण रंगोलीवर अॅसिड अटॅक झाला तेव्हा मी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. माझी वाइफ जरीना मला म्हणाली की, मी एक अॅसिड फेकणाऱ्याशी वैर घेत आहे, जो आपल्या फॅमिलीला नुकसान पोचवू शकतो. तरीही कंगनाने एका संध्याकाळी मला फोन केला आणि मला शिव्या देऊ लागली आणि माझी तुलना अॅसिड फेकणाऱ्या व्यक्तीसोबत करू लागली. आदित्य यांच्यानुसार, त्यांनी रंगोलीच्या प्लास्टिक सर्जरीसाठी 10 लाख रुपये खर्च केले होते. हे पैसे कधीच त्यांनी परत मागितले नाही. 

बातम्या आणखी आहेत...