आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranuot Said, 'I Deserved To Get Padma Shri Three Years Ago, But Then There Was A Conspiracy.'

कंगना रनोट म्हणाली, 'मला तीन वर्षांपूर्वीच पद्मश्री मिळायला हवा होता, पण तेव्हा षड‌्यंत्र रचले गेले'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नुकतीच पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली. अभिनेत्री कंगना रनोटचे नावदेखील या पुरस्काराच्या यादीत समोर आले आहे. कंगनाने यापूर्वी तीन वेळेस राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. ज्या दिवशी पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली त्याच दिवशी संध्याकाळी कंगना आपल्या आगामी 'थलायवी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी चेन्नईला रवाना झाली होती. या मुलाखतीत तिने पुरस्कार मिळल्याचा आनंद आणि यावरुन उठलेल्या वादावर चर्चा केली...

कंगना म्हणाली, भारतरत्न आणि राष्ट्रीय पुरस्कारानंतर हा भारताचा सर्वात मोठा सन्मान आहे. ज्या लोकांनी माझे नाव यासाठी सुचवले त्या सर्व लोकांचे मी आभार मानते. खरं तर, पद्मश्री मला तीन वर्षांपूर्वीच मिळायला हवा होता, मात्र तेव्हा तर माझ्या विरोधात षडयंत्र रचले जात होते. त्यावेळी माझ्या सहकलाकाराने मला नोटीस पाठवली होती. त्यामुळे माझे नाव पद्मश्री विजेत्यांच्या यादीतून काढण्यात आले होते. या पुरस्कारासाठी कोणत्याच प्रकारचे नोटीस किंवा केस आपल्यावर सुरू नसावा लागतो. असेच काही तरी झाले असेल असे मला वाटते. हे मी कन्फर्म सांगत नाही, मात्र त्यामुळेच माझे नाव यादीतून काढून टाकले असावे, असे मला वाटते. त्यानंतर प्रियांका चोप्राला पुरस्कार मिळाला होता.

अदनानला पद्मश्री जाहीर झाल्याच्या विषयावर कंगना म्हणाली...

अदनान सामी या पुरस्कारासाठी योग्य आहेत. खरं तर, विरोध करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायला हवे. अशा लोकांना भारत कळालाच नाही, असे वाटते. ते भारताचे नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात काहीच हरकत नाही. संगीत क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ते २० वर्षापासून संगीत क्षेत्रात काम करतात.

कारकीर्दीत आणि जीवनात मदत केलेल्या लाेकांचे आभार

या प्रसंगी मी माझे गुरू सूर्यनारायण यांचा आभार व्यक्त करते. ते मला अनेक वर्षापासून योगा िशकवत आहेत. त्यांच्यामुळेेच मी कठीण परिस्थितीतही ठामपणे उभी राहते. स्वामी विवेकानंद यांचे मी अनुसरण करते. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालूनच येथपर्यंत पोहोचले आहे. अनुराग बसू ज्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली ज्यांचेही मी अाभार व्यक्त करते. ते माझे मेंटॉर राहिले आहेत. थिएटरचे प्रशिक्षण देणाऱ्या अरविंद गौड यांचेदेखील आभार व्यक्त करते. याबरोबरच माझी आई आणि बहिणीलाही मी क्रेडिट देते. त्या प्रत्येक क्षणी माझ्यासोबत ठामपणे उभ्या असतात. त्यांनी मला चांगले संस्कार दिले आहेत. त्यामुळेच मी अाज इतके कणखर झाले.
 

बातम्या आणखी आहेत...