आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाच्या बहिणीने बॉलिवूडला दिले आव्हान, म्हणाली - तर कंगना अभिनय सोडून देईल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटची थोरली बहीण आणि मॅनेजर रंगोली चंडेलने बॉलिवूडला ओपन चॅलेंज दिले आहे. जर कुणी हे आव्हान पूर्ण केले तर कंगना अभिनय क्षेत्र सोडणार, ही यातील विशेष बाब आहे. 

रंगोलीने शुक्रवारी ट‌्वीट केले, ‘मी सर्व इंडस्ट्रीला आव्हान करते, जर कोणत्याही अभिनेत्रीने एकटीच्या बळावर 70  ते 100 कोटींचा बजेट असलेला चित्रपट हिट केला तर कंगना अभिनय करणे सोडून देईल.' 

या बातमीला शेयर करतांना रंगोलीने ट्वीट केले,  “अरे.. खानभाई 155 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या चित्रपटाला तू फ्लॉप म्हणतोस. तुझ्या बागी 3 ने विकेंडला फक्त 49 कोटी रुपयांचीच कमाई केली. हे काही योग्य नाही. सध्या तुझे खराब दिवस सुरु आहेत.”

बातम्या आणखी आहेत...